नांदेडमध्ये शनिवारी चार अहवाल पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

नांदेडमध्ये शनिवारी चार अहवाल पॉझिटिव्ह

नांदेड : जिल्हाभरात सध्या ९७.३ टक्के कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शनिवारी (ता.१३) प्राप्त झालेल्या ७५३ अहवालापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९० हजार ४४१ इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात तीन रुग्ण कोरोना आजारातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ८७ हजार ७६१ इतकी झाली आहे.

सध्या जिल्हाभरात २७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात एकाही बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या दोन हजार ६५३ वर स्थिर आहे. शनिवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात तीन तर, धर्माबाद तालुक्यातील एक असे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील - एक व नांदेड वाघाळा महापालिकेअंतर्गत एनआरआय भवन, गृहविलगीकरण कक्षातील दोन असे तीन रुग्ण कोरोना आजारातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या २७ बाधितांवर उपचार सुरु असून, त्यापैकी तीन कोरोना बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

loading image
go to top