Success Story : गावाने ‘ढ’ म्हणत हिणवले, तो बनला अधिकारी! बारावीत चारवेळा नापास झाल्यावरही त्याने चिकाटी न सोडता केला अभ्यास
Struggle To Success : चार वेळा बारावीत नापास झालेल्या आकाश शिंदे यांना गावकऱ्यांनी हिणवले. मात्र, त्यांनी जिद्दीने प्रयत्न करून अधिकारी बनून गावात पुनरागमन केले.
कंधार : घाव वर्मी बसला की माणसाच्या मनात जिद्द निर्माण होते. संघर्ष करण्याची ताकद त्याच्यात येते. आणि तो अशी काही कामगिरी करून दाखवितो की, समाजाला त्याचे कौतुक करावेच लागते.