
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंघाराणी अंबुलगेकर, महापालिकेच्या महिला व बाल कल्याणच्या सभापती सरिता बिरकले, महादेव कोळी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष वेंकट मुदीराज, कार्यक्रमाच्या संयोजिका तथा महाराष्ट्र राज्य कोळी समाज संघटना युवा विभागाच्या अध्यक्षा किरण यशवंतकर (मुदीराज), सुरेश आंबुलगेकर, पुंडलिक मोरे, रावसाहेब पपुलवाड, बळीराम कोनेरी, दत्तात्रय अन्नमवार, गंगासागर आणेवार, सोपानराव मारकवाड यांची उपस्थिती होती.
नांदेड : शहरातील गोकुळनगर परिसरात वाल्मीक रुषीचे मंदिर बांधकामासाठी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दहा लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले. शहराच्या राजर्षी शाहू महाराज पुतळा यशवंतनगर (विस्तारित ) भागात कै. व्यंकटस्वामी रामचंद्रराव पोन्ना (मुदीराज) यांच्या स्मरणार्थ आदिवासी कोळी व मन्नेरवारलु महोत्सवाच्या आयोजित कार्यक्रमात आमदार कल्याणकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंघाराणी अंबुलगेकर, महापालिकेच्या महिला व बाल कल्याणच्या सभापती सरिता बिरकले, महादेव कोळी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष वेंकट मुदीराज, कार्यक्रमाच्या संयोजिका तथा महाराष्ट्र राज्य कोळी समाज संघटना युवा विभागाच्या अध्यक्षा किरण यशवंतकर (मुदीराज), सुरेश आंबुलगेकर, पुंडलिक मोरे, रावसाहेब पपुलवाड, बळीराम कोनेरी, दत्तात्रय अन्नमवार, गंगासागर आणेवार, सोपानराव मारकवाड यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले की, मन्नेरवारलू व महादेव कोळी समाज हा आजही शासकीय योजनांपासून उपेक्षित समाज म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हा समाज असून त्यांच्या उन्नतीसाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर नांदेड शहराच्या गोकुळनगर भागात श्री वाल्मीक रुषीचे मंदिर बांधकामासाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच समाजाच्या काही अडचणी असतील तर त्या मला सांगा मी त्या सोडविण्याचा प्रयत्न करीन असे त्यांनी आश्वासन दिले.
हेही वाचा - नांदेड : बिनविरोध ग्रामपंचायतसाठी 25 लाखाचा निधी देणार- आमदार मोहन हंबर्डे -
यावेळी संयोजिका किरण यशवंतकर यांनी आपल्या प्रास्ताविकात समाजाच्या विविध मागण्या उपस्थित केल्या. त्यात मन्नेरवारलू व महादेव कोळी समाजाचे जातीचे प्रमाणपत्र हे नांदेड जिल्ह्यातच देण्यात यावे. किनवट येथे नव्याने निर्माण केलेले उपसमिती कार्यालय हे नांदेडमध्येच सुरु करावे आणि जात पडताळणी समितीच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेले श्री पावरा यांची बदली करावी अशा मागणी करण्यात आल्या. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना दोन्ही समाजासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी येतात परंतु खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ होत नाही. या योजना समाजातील बांधवांना माहीत नाहीत त्यामुळे आलेला मोठा निधी परत जातो. त्यासाठी विविध कार्यक्रमांतर्गत समाजातील महिलांना सबलीकरण, वधू- वर परिचय मेळावा, लोककलासारखे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन या दोन्ही समाजाने एकत्र व एकजुटीने रहावे जेणेकरुन आपला हक्क आपणास शासनाकडून मिळविता येईल. तसेचभविष्यात हा कार्यक्रम गोदावरी नदी किनारी तीन दिवसाचा हा महोत्सव व्हावा अशी अपेक्षा किरण यशवंतकर यांवी व्यक्त केली. आदिवासी महोत्सव हा मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरात आयोजित केल्या जातो. परंतु नांदेडमध्ये हा महोत्सव व्हावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मंगाराणी अंबुलगेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा प्रकारचे कार्यक्रम सतत समाजबांधवांनी घेत रहावे मी त्यांच्यासोबत आहे. असे मंघाराणी आंबुलगेकर आणि यांनी सांगितले.