esakal | भावी पिढीने वनरक्षणासाठी पुढाकार घ्यावा : संध्या डोके
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

भावी पिढीने वनरक्षणासाठी पुढाकार घ्यावा : संध्या डोके

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगर : वन्यजीव हे अन्नसाखळी तयार करण्याचे काम करतात, मात्र मागील काही वर्षापासून मानवांनी त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केल्याने वन्यप्राण्यांनी गावकुशीकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले असून, हे वाचविण्याचे काम तुम्हा युवा पिढीनां करावयाचे आहे. त्यासाठी प्रत्येक युवकांनी वृक्ष संवर्धणाबरोबर वन्यप्राण्यांचे महत्व घरच्या वडीलधाऱ्या मंडळींना समजून सांगावे असे आवाहन हिमायतनगर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संध्या डोके यांनी केले.

ते वन्यजीव सप्ताहानिमित्त हिमायतनगर येथील राजा भगीरथ विद्यालयात कामाजी पवार, ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांना वनांचे महत्व आणि जनजागृतीपर माहिती देताना बोलत होत्या.

यावेळी मंचावर कमलाकर दिक्कतवार, बी.आर. पवार, माधुरी तिप्पनवार, गोविंद गोडसेलवार, अनिल मादसवार यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी प्रथम वन विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वनांतील प्राणी, वनांचे रक्षण आणि वृक्षारोपण व संगोपन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. बी. कोलते, एम. वाय. चाबुकस्वार, व्ही. बी. चाटसे वनरक्षक, एस.जी. खालसे, एन. बी. गिते, डी.एस.सोने, डी.एस. केंद्रे, आर. व्ही. पोतदार, के.एस. व्होनशेट्टे, जी.एस.अमृतवार, एम.डी.चव्हाण, ए.एल.कोल्हे, एस.एम.केंद्रे आदींनी परिश्रम घेतले. या वेळी पतलेवाड सर, कोंडामंगल सर, मुठेवाड सर आदींसह राजा भगीरथ विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी कोरोना महामारीचे सर्व नियम पाळत उपस्थित झाले होते.

loading image
go to top