esakal | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची मदत द्या- खासदार चिखलीकर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अशा परिस्थितीत राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे  तात्काळ पंचनामे करावेत. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी रब्बी हंगामासाठी मोफत बी बियाणे पुरवठा करावेत अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजाराची मदत द्या- खासदार चिखलीकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे .त्यामुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ हेक्टरी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मूग उडीद पीक पूर्णतः वया गेले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेल्या  घास अतिवृष्टीने हिरावला असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे  तात्काळ पंचनामे करावेत. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी रब्बी हंगामासाठी मोफत बी बियाणे पुरवठा करावेत अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. 

रोख मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावेत 

ता. 22 ऑगस्ट पर्यंत सतत पाच दिवस नांदेड जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन झाले नाही. श्री. गणेशाचे आगमन ता. 22 ऑगस्ट रोजी झाले व शेतक-यावरील संकट दुर होण्यास सुरुवात झाली. म्हणजे ता. 23 ऑगस्टपासून सुर्यदर्शन झाले. आता शेतकरी शेतीतील कामे सुरु करत आहेत. शिवाय  जिल्हाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. तूर, मूग, उडीद, ज्वारी पीक उध्वस्त झाली असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रति हेक्टरी 25 हजार रुपयांची रोख मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करावेत अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही पत्र पाठवून राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले पाहिजे अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी केली आहे.

हेहीा वाचा -  सुनेला ठार मारुन वेशांतर करुन राहिला, मात्र पोलिसांच्या...

जनावरांना लम्पी आजारापासून वाचवण्यासाठी गावोगावी कॅम्प लावावेत 

नांदेड : एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत सापडला असतांना शेतकर्‍यांची जीवनसंजीवणी असलेल्या पशुधनाला लम्पी स्किन आजाराने ग्रासले. या आजाराने शेतकर्‍यांची जनावरे दगावत आहेत. शेतकर्‍यांची जनावरे वाचवण्यासाठी शासनाने जनावरांसाठी लसीकरणाचे कँम्प लावावेत अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका निवेदनाव्दारे राज्य शासनाकडे केली आहे.

गावोगावी लसीकरण मोहीम 

देशात सर्वत्र करोना विषाणूजन्य आजाराचा चांगलाच फैलाव होतांना दिसत आहे. त्यातच गत आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या  शेतकर्‍यांच्या समोर जनावराचे एक मोठे संकट उभे टाकले असून लम्पी स्किन या संसर्गजन्य रोगामुळे शेतकर्‍यांची जनावरे दगावत आहेत. आज घडीला शेतकर्‍यांच्या जनावरांची किंमत लाखो रुपयामध्ये असल्याने शासनाने संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या जनावरांना वाचवण्यासाठी गावोगावी लसीकरण मोहीम राबवण्यासाठी कॅम्प लावावेत व शेतकर्‍यांची जनावरे वाचवावीत अशी मागणी नांदेडचे खा. चिखलीकर यांनी एका निवेदनाव्दारे राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धनमंत्री यांच्याकडे केली आहे.