Good news: जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्के- जिल्हाधिकारी डाॅ. विपिन

प्रल्हाद कांबळे
Thursday, 30 July 2020

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्के असून मृत्यूदरातही कमालीची घट असून ती चार टक्क्यावर आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी बुधवारी (ता. २९) सायंकाळी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव वाढत असून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या जशी वाढत आहे त्याच गतीने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्के असून मृत्यूदरातही कमालीची घट असून ती चार टक्क्यावर आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी बुधवारी (ता. २९) सायंकाळी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित मृत्यूचा दर ४. ३ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्के आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी आजार न   लपवता तातडीने तपासणीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. तरच आपण मृत्यूचा दर रोखण्यात यशस्वी होऊ असे जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी झूम ॲपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना संदर्भात जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोना बाधित रुग्णांची संख्या जशी वाढली तशी तपासणी यंत्रणा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह संख्या देखील वाढत आहे. त्यावर उपचार करणारी यंत्रणा जिल्ह्यामध्ये सध्या सज्ज आहे. परंतु नागरीक कोरोनाचा आजार अधिक वाढल्यानंतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यूचा दर वाढत आहे तो कमी करण्यासाठी कोरोनाचे लक्षण दिसताच तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन केले.

हेही वाचानांदेड : शासनाला दरमहा ४० कोटी महसुल देणारी कंपनी बंद...कशामुळे ते वाचा?

नांदेड शहरामध्ये पाच फिरत्या वाहनांद्वारे तपासणी

जिल्ह्यात अॅन्टीजेन टेस्टद्वारे प्रत्येक तालुक्याला तपासण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड शहरामध्ये पाच फिरत्या वाहनांद्वारे तपासण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यामध्ये सर्व आरोग्य यंत्रणा व रुग्णालय सज्ज आहेत असेही त्यांनी सांगितले. महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, डाॅ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरीचे अधिष्ठाता डॉ. सुनील देशमुख यांची उपस्थिती होती.

खासगी रुग्णालयावर लक्ष

शहरात खासगी रुग्णालयात उपचार करताना जर रुग्णाकडून ज्यादा बिलाची आकारणी केल्यास त्यासंबंधी तक्रार आल्यास याची गंभीर दखल घेण्यात येईल. महापालिकेच्या पथकाकडून संबंधित रुग्णालयाची तपासणी करण्यात येईल. त्यात दोषी आढळल्यास रुग्णालयाच्या प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्यात येईल. 
- आयुक्त डॉ. सुनील लहाने

कोरोना बाधीताच्या अंत्यसंस्कारासाठी दोन वेगळ्या रुग्णवाहिका
 
स्वतंत्र दोन रुग्णवाहिका अंत्यसंस्कारासाठी कोरोना बाधित रुग्ण पावलेल्या मूर्तीच्या अंत्यसंस्कारासाठी व निगेटिव्ह पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी एकाच रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्ह्यातील आमदारांनी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी निधी दिलेला आहे. नऊ रुग्णवाहिका खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मनपाला दोन नव्या रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत व पूर्वीच्या दोन रुग्ण या स्वतंत्र अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 
- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: 65% cure rate of corona patients in the district Collector Dr. Vipin nanded news