esakal | Good News : ईस्लापुर येथे दिव्यांगांना अन्न- धान्यांची मदत- बालाजी आलेवारचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

शिवणी फोटो

Good News : ईस्लापुर येथे दिव्यांगांना अन्न- धान्यांची मदत- बालाजी आलेवारचा पुढाकार

sakal_logo
By
विठ्ठल लिंगपुजे

शिवणी (ता. किनवट, जिल्हा नांदेड ) : कोरोनाच्या पहिल्या लाटेत हातावर पोट असणऱ्यांना मदत करण्यसाठी अनेकांनी हात पुढे केले होते. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. संपूर्ण भारतात थैमान घालणारी कोरोनाच्या दुस-या लाटेत हातावर पोट असणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अशात दानशूर व्यक्तींचा हात आखडत असताना कोरोनाच्या संसर्गातून नुकतेच बाहेर पडलेले शिवणी येथील बालाजी आलेवार पुढे आले आहेत.

त्यांनी पहिल्या लाटेतही तेलंगणात कामासाठी गेलेले मजूर शिवणी मार्गे पायी येत असताना त्यांना आपल्या शेतात राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. इस्लापुर येथील हुतात्मा स्मारक येथे माजी महसूल राज्य मंत्री डी. बी. पाटील व किनवट, माहूरचे आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली भाजप तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार यांच्या वतीने ता. २६ एप्रील रोजी इस्लापुर येथील गरजु व दिव्यांग व्यक्तींना अन्न- धान्य वाटप करण्यात आले.

हेही वाचा - Good News:रेमडेसिव्हिर न देता सात बाधित झाले बरे; नांदेड प्रशासनाचे यश

यावेळी ईस्लापुर येथील वैद्यकीय अधिकारी भारती, सपोनि बोदगिरे, माजी सरपंच देविदास पळसपुरे, पत्रकार नारायण दंतलवाड, माजी पं. स. सदस्य तुकाराम बोनगीर, प्रकाश दंडे, राजु आंबटवाड, पप्पू तोटावाड, बालु पेशवे, प्रकाश भोयर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गरडे, लतीफ कोसमेट, गजानन कदम, रवी कसबे, शिवशंकर मुंडे, शिवशंकर मेळेगावकर व ईस्लापुर सर्कलमधील आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध पक्षातील कार्यकर्ते, सामाजिक भावनेतून काम करणारे सर्व समाजसेवक, पत्रकार बांधव व अन्न धान्य वाटप कार्यक्रमासाठी सहकार्य केलेले सर्व बालाजी मित्र मंडळातील युवा वर्ग व गावकरी मंडळी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image