चांगली बातमी : लोहा येथील बालिकेचा बालविवाह रोखला- जिल्हा बाल संरक्षण कक्षाची तत्परता

file photo
file photo

नांदेड : लग्नासाठी मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्षाच्या वर असणे कायद्याने बंधनकारक आहे. लहान वयात मुलीचे लग्न केले तर भविष्यात तिला अनेक शारिरीक व्याधीना सामोरे जावे लागते. त्यामुळे वयात आल्यानंतरच लग्न करणे हे नवदामप्त्यांसाठी आवश्यक असते. परंतु आजही काहीजण मुलीचा विवाह लहान वयातच करुन आपली जबाबदारी पार पाडल्याचे समजत आहेत. असाच होणारा एक बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्ष व लोहा पोलिसांच्या मदतीने गुरुवारी (ता. २४) होणारा विवाह थांबविण्यात आला. यावेळी मुलीच्या पालकांचे व उपस्थितीतांचे समुपदेशन करण्यात आले. 

लोहा तालुक्यातील एका १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह होत असल्याची माहिती नांदेडच्या चाईडलाईन १०९८ ला प्राप्त झाली. चाईल्डलाईने ही बाब बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळविली. यानंतर हा बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने लोहा शहर गाठून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर हा प्रकार लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांना सांगितला. 

जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या विद्या आळणे, चाईल्ड लाईनचे बी. वी. अलेवार, निता राजभोज, आकाश मोरे यांनी लोहा येथे जाऊन बालिकेबाबत इत्यंभूत माहिती घेतली. तसेच लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांना या बालविवाह होणार असल्याची माहिती देऊन त्यांनीही या प्रकरणात तात्काळ दखल घेतली. श्री. भागवत जायभाये यांच्या मदतीने मुलीचे वडील व नातेवाईक यांना विश्वासात घेऊन बालविवाह केल्यानंतर होणारा परिणाम बाबतची माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी देखील सदर बालविवाह अजाणतेपणे करीत असल्याबाबत कबूल केले व मुलीचा विवाह वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच करेल असे आश्वासन देऊन मुलीच्या शैक्षणिक तसेच काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने आपण आपल्या मुलीची सर्व काळजी घेऊ असे समितीसमोर आश्वासन दिले.

तसेच संबंधित वार्डातील नगरसेवक करीमोदिन शेख यांनीही सदर बालविवाहाची तात्काळ दखल घेऊन हा बालविवाह बेकायदेशीर असून हा आपल्या भागात होणार नाही याचे आश्वासन दिले. तसेच मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने आपण सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन दिले. आपल्या वार्डात बालविवाह होणार नाही या बाबत आपण जागरुक राहू असे सांगितले. 

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असेल तर चाईल्डलाईन- १०९८ तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नांदेड यांना संपर्क करुन होणारे बालविवाह थांबविता येतील. कारण बालविवाहाचे दुष्परिणाम भविष्यात दिसून येऊ नये म्हणून अगोदरच काळजी घेणे आवश्यक आहे. असे बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून असे प्रकार समाजातील प्रत्येकाने उघडकीस आणून द्यावे असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती काळम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे आणि पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com