गुड न्यूज : मराठवाड्यातून तीन रेल्वे धावणार प्रवाशांना दिलासा

प्रल्हाद कांबळे
Saturday, 3 October 2020

त्यात नांदेड- पुणे- नांदेड एक्सप्रेस व नांदेड- मुंबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस या दोन गाड्या नांदेडहुन सुटणार असून जालना येथून मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी एक्सप्रेस देखील सुरू होणार आहे.

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे बोर्डाने संबध देशभर बंद केलेली प्रवाशी रेल्वेसेवा अनलॉक केले जात असल्याने हळुहळु रेल्वे विभागाकडून वेशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत आहेतयामुळे काही अशी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.  त्यात नांदेड- पुणे- नांदेड एक्सप्रेस व नांदेड- मुंबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस या दोन गाड्या नांदेडहुन सुटणार असून जालना येथून मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी एक्सप्रेस देखील सुरू होणार आहे. मराठवाड्यातून तीन रेल्वे गाड्या धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकणार आहे.

ता.15 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंबर या सणासुदीच्या दिवसात दोनशे विशेष रेल्वे चालविण्याचे रेल्वे बोर्डाने निश्चित केले असून राज्य सरकारच्या गरजेनुसार त्यापेक्षा अधिक रेल्वे सुरू होऊ शकतात अशी माहिती रेल्वे विभागाने कळविले आहे. सध्या रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद आहे. एक जूनपासून रेल्वे विभागाने देशभरात लांब पल्ल्याच्या १०० विशेष गाड्या सुरू केल्या. त्यात नियमितपणे धावणाऱ्या नांदेडच्या सचखंड एक्सप्रेसचा समावेश आहे. त्यानंतर परभणी- हैदराबाद- परभणी ही विशेष रेल्वे दररोज सुरू करण्यात आली. 

हेही वाचाकांद्याचे भाव वधारल्याने ” ये रे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या” असे म्हणण्याची वेळ

येत्या ता.12 सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्यात नव्या विशेष रेल्वेगाड्या सुरू 

नांदेडहुन पुणे व मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून एसटीने प्रवास करताना रस्त्यावरील होणारा त्रास, लागणारा वेळ व तिकिटाची अधिक रक्कम यामुळे सामान्य व गरिबांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. रेल्वे बोर्डाने राज्यात काही रेल्वे सुरू करण्याचे ठरवले आहेत. येत्या ता.12 सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्यात नव्या विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्याबाबत सर्व विभाग व्यवस्थापकांना आपापल्या भागातील चर्चा करून आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात कदाचित यापेक्षा अधिक रेल्वेगाड्या सुरू होऊ शकतात. राज्य सरकारांच्या गरजेनुसार प्रवासी वाहतुकीचा दैनंदिन आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. रेल्वे पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विशेष रेल्वे सुरू करण्यावर भर देत असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

रेल्वेप्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

मराठवाड्यातून सुरु होणाऱ्या या तीन एक्सप्रेस गाड्यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांची पुरती सोय झाली आहे. सध्या मराठावाड्यातून दोनच रेल्वे धावत आहेत. त्यात नांदेड- अमृतसर सचखंड एक्सप्रेस आमि नांदेड - हैद्राबाद एक्सप्रेसचा समावेश आहे. आता नांदेड- पूणे, नांदेड- मुंबई आणि जालना- मुंबई अशा तीन गाड्या सुरु होणार असल्याने रेल्वेप्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: Consolation to passengers who will run three trains from Marathwada nanded news