
महिला सशक्तीकरनासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांचे पुढाकार
शिवणी (ता. किनवट, जिल्हा नांदेड ) : मराठवाडा विकास मंडळ २०१९- २०२० विशेष निधीअंतर्गत जिल्ह्यातील मानवी निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यासाठी व मानव विकास अंतर्गत घोषित झालेल्या तालुक्यासाठी मराठवाडा विकास मंडळाद्वारे महिलांचे सशक्तीकरण व महिला आत्मनिर्भर आणि उद्योजक व्हावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी केलेल्या प्रयत्नांनी किनवट तालुक्यासाठी २० लाख रुपये निधी मंजूर झाला.
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे जे स्थापीत महिला बचत गटआहेत अशा महिला गटांतिल महिलांना रोजगार उपलब्द व्हावा व ग्रामीण भागांतील महिला आत्मनिर्भर व्हावे यासाठी कुटीर उद्योग संकल्पना यशस्वी करण्यासाठी मराठवाडा विकास मंडळ अंतर्गत किनवट तालुक्यासाठी २० लाख रुपयांचे विविध प्रकारचे लघु उद्योगासाठी यंत्रणा खरेदी करण्यात आली. यात एकाच गावामध्ये सर्व प्रकारचे लघु उद्योग चालावे यासाठी पिठाची गिरणी, पापड मशीन, मसाला मशीन, मिरची कांडप, सेवया मशीन, चिप्स व मिर्ची प्लवरायझर अशा मशीनसह व इतर संसाधने मराठवाडा विकास मंडळ व महिला आर्थिक विकास यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आर्थिक महामंडळद्वारे स्थापित "प्रगती लोकसंचलीत साधन केंद्र" किनवट तालुका अंतर्गत तालुक्यातील शिवणी, 'माविम'महिला बचत गटातील महिलांचे आर्थिक परिस्थिती उंचावण्याकरिता व उद्योजक महिला बनविन्याच्या उद्देशाने तालुक्यातील शिवणी येथे महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास व मराठवाडा विकास महामंडळ यांच्या संयुक्त योजनेतून शिवणी येथिल महिला बचत गटातील सदस्यांना अनेक प्रकारच्या मशिनरी वितरण करण्यात आले आहे.
हेही वाचा - नांदेड : राष्ट्रीय लोकअदालतीत नऊ कोटी ३२ लाखाची तडजोड तर दोन हजार ८१ प्रकरणे निकाली -
या योजना यशस्वी करण्यासाठी चंदनसिंग राठोड जिल्हा समन्वय अधिकारी (माविम नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुका माविम अंतर्गत "प्रगती लोकसंचलीत साधन केंद्र" च्या अध्यक्ष प्रभावती शेंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवणी येथील प्रमुख सदस्य कमलबाई देशमुख यांच्या उपस्थितीत तालुका व्यवस्थापक विशाल श्रोते, लेखपाल सिद्धीकी अजहर, प्रेरक रणिता कारलेवाड, संयोगीनी महानंदा पाटील, शिवणी येथील महिला पोलिस पाटील उमंग महिला बचत गटाच्या अध्यक्ष अनुसायाबाई बोंदरवाडसह करुणा वानोळे, रेणुकाबाई बसिनवाड, दीपा चेपूरवार, लक्ष्मीबाई रेड्डीवार, गजुबाई तमलवाड, सह विविध बचत गटातील महिला आणि प्रकाश कारलेवाड उपस्थित होते.
संपादन - प्रल्हाद कांबळे