शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : अखेर ‘त्या’ सोयाबीन उत्पादक कंपनीवर नांदेडात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

शेतकऱ्यांनी राज्यभर तिव्र संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधीनी हा विषय लावून धरला. अखेर प्रशासनाने या तक्रारींची दखल घेत कृषी विभागाच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात संबंधीत सोयाबीन उत्पादक कंपनीवर सोमवारी (ता. २९) फसवणुकीचा गुन्हा दाखल

नांदेड : अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज काढून आपल्या काळ्या आईची कुश भरण्यासाठी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. ते महागामोलाचे बियाणे आपल्या शेतत पेरले. मात्र पेरलेले बियाणे उगवले नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी राज्यभर तिव्र संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधीनी हा विषय लावून धरला. अखेर प्रशासनाने या तक्रारींची दखल घेत कृषी विभागाच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात संबंधीत सोयाबीन उत्पादक कंपनीवर सोमवारी (ता. २९) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाड्यातील पहिला गुन्हा दाखल झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. 

देशावर व संबंध जगावर सध्या कोरोनाचे महाभंयकर संकट सुरू आहे. या संकटामुळे सर्वच क्षेत्र डबघाईस आले आहे. या संकटात शेतकरीही सुटला नाही. शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमी अठराविश्‍व दारित्र्य त्यांच्या पाचवीला पुंजलेले आहे. कधी आवर्षण तर कधी ओला दुष्काळ यमुळे मागील पाच वर्षापासून राज्यात शेतकरी आपल्या सुखी संसार उघड्यावर टाकून आत्महत्या करत आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असूनही निसर्गाच्या सपाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबत नाहीत.

 हेही वाचा चाकरमान्यांचे पाल्यही गिरवणार गावच्या शाळेत धडे, कसे ते वाचा?
 
१२५० तक्रारीनंतर गुन्हा दाखल

यावर्षी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बियाणे उत्पादक कंपन्यांनी फटका दिला. महागामोलाचे बियाणे खरेदी करुन स्वत: कर्जात बुडून खरेदी केलेले सोयाबीनचे बियाणे आपल्या शेतात पेरले. सुरवातीला निसर्गाने साथ दिली. मात्र पेरलेले सोयाबीनचे बियाने उगवले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा खचुन गेला आहे. बियाणे उगवन क्षमता चाचणी परभणी कृषी विद्यापीठात करण्यात आल्यानंतर हे बियाणे निकृष्ट व अप्रमाणीत घोषीत करण्यात आले. इंदौर येथील मे. ईगल सिड्स ॲण्ड बायोटेक कंपनीने उत्पादन केलेले सोयाबीनचे बियाणे राज्यभर आपल्या दुकानदारांमार्फत विक्री केले. 

येथे क्लिक कराकोरोनासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती उच्च न्यायालयात जाणार

वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी व संबंधीत कृषी अधिक्षक कार्यालयात शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी यात लक्ष घातले. यावरून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संतोष बालाजी नादरे यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मे. ईगल सिड्स ॲण्ड बायोटेक कंपनीवर फसवणुक व बियाणे कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ करत आहेत. 

    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmers: Finally, a case has been filed against 'that' soybean producer in Nanded