शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : रब्बी हंगामासाठी निम्म मानार प्रकल्पातून 25 नोव्हेंबरला पहिली पाणीपाळी

file photo
file photo

नांदेड  : जिल्ह्यातील मोठे प्रकल्प निम्न मानार (बारुळ) यात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून या प्रकल्पावर रब्बी हंगाम 2021 साठी नियोजन करण्यात आले आहे. निम्न मानार प्रकल्पातून प्रथम रब्बी हंगामासाठी पाणीपाळी 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व बागायतदारांनी पाटबंधारे शाखेत रितसर पाणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरुन सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

सध्या आचारसंहिता लागु असल्याने कालवा सल्लागार समीतीच्या फक्त शासकीय सदस्यांची बैठक घेण्यात आली असून रब्बी हंगामात तिन पाणी पाळी देण्याचे नियोजन केले आहे. तर उर्वरीत पाणीपाळी बाबतचा निर्णय नियमीत कालवा सल्लागार समीतीच्या बैठकीत घेण्यात येईल.

निम्न मानार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांनी नमुना नंबर 7, व 7(अ) मध्ये पाणी अर्ज मागविण्यात येत आहेत. पुढील दर्शविलेल्या शर्तीस शासनाच्या प्रचलित नियमास अनुसरुन पाणी अर्जास मंजूरी देण्यात येईल. महाराष्ट्र शासन,जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी.

आवर्तन प्रारंभ होण्याच्या व समाप्त होण्याच्या दिनांकामध्ये क्षेत्रीय परिस्थितीनुसार थोडा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजुर उपसा, मंजुर जलाशय उपसा व मंजुर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात व विहीत दिनांकापुर्वी संबधित शाखा कार्यालयात दाखल करावेत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक आहे. पाणीपट्टी  न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजुर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावुन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. 

शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधीत लाभधारकांची राहीलउडाप्याच्या अंतीम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपतीचा काटेकोर पणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाने टाळावा. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहातील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता एन. व्ही. पत्तेवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com