शेतकऱ्यांना गुड न्यूज : या परिमंडळातील एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार दिवसा विज

प्रल्हाद कांबळे
Saturday, 22 August 2020

नांदेड परिमंडळातील पाच हजार 272 शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाव्दारे प्रत्यक्ष वीज जोडणी देण्यात आली आहे.

नांदेड : शेतकऱ्यांना सौर ऊर्जेव्दारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून शाश्वत शेतीची स्वप्नपुर्ती करून देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सौरकृषीपंप वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर असून नांदेड परिमंडळातील पाच हजार 272 शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाव्दारे प्रत्यक्ष वीज जोडणी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची अंधार यात्रेतून सुटका होवून दिवसा विजेचे स्वप्न पुर्णत्वास आल्याची भावना लाभार्थी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतलीनाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरूनही त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे. अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात आलेले आहे. नांदेड परिमंडळासाठी 9 हजार 105 शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाव्दारे वीज जोडणी देण्याचे निर्धारीत केलेले आहे. त्यानुसार वाटचाल सुरू असून 9 हजार 377 शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेले आहे. आपल्या हिस्स्याची रक्कम भरलेल्या 9 हजार 67 शेतकऱ्यांनी उजन्सीची निवड केलेली असून आजपर्यंत 5 हजार 272 शेतकऱ्यांना सौरकृषीपंपा व्दारे वीज जोडणी दिली आहे.

हेही वाचा - नांदेडला कोरोनाने सहा जणांचा मृत्यू ; दिवसभरात १५१ पॉझिटिव्ह

1131 शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाव्दारे वीज जोडणी

नांदेड परिमंडळांतर्गत नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्याचा समावेश असून नांदेड जिल्हयासाठी 2 हजार 786 सौरकृषीपंप स्थापीत करण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. मंजूर अर्जापैकी 3432 शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहेत. यापैकी 1924 शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कम भरलेली आहे. यातील कोटेशन भरलेल्या 1791 शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली असून 1131 शेतकऱ्यांना सौरकृषीपंपा व्दारे वीज जोडणी दिली आहे.

1925 शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाव्दारे वीज जोडणी 

परभणी जिल्हयासाठी 4 हजार 428 सौरकृषीपंप स्थापीत करण्याचे निर्धारीत लक्ष्य असून मंजूर अर्जापैकी 5376 शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहेत. यापैकी 3907 शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कम भरलेली आहे. यातील रक्कम भरलेल्या 3843 शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली असून 1925 शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाव्दारे वीज जोडणी दिली आहे.

उर्वरीत शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाव्दारे वीज जोडणी देण्याच्या सुचना

हिंगोली जिल्हयासाठी 1 हजार 891 सौरकृषीपंप स्थापीत करण्याचे निर्धारीत लक्ष्य असून मंजूर अर्जापैकी 5052 शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहेत. यापैकी 3546 शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कम भरलेली आहे. यातील रक्कम भरलेल्या 3433 शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली असून 2216 शेतकऱ्यांना सौरकृषीपंपा व्दारे वीज जोडणी दिली आहे. निर्धारीत लक्ष्यापेक्षा जास्त्‍ शेतकऱ्यांना सौरकृषीपंपा व्दारे वीज जोडणी देण्याची उत्कृष्ट कामगिरी हिंगोली मंडळाने करून दाखवली आहे. मागील वर्षच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि कोरोनाच्या काळात वाहतुकीस मार्यादा आल्यामुळे काम पुर्ण करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर तसेच नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे, परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे तसेच हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी एजन्सी निहाय आढावा घेवून लवकरात लवकर उर्वरीत शेतकऱ्यांना सौरकृषीपंपाव्दारे वीज जोडणी देण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व एजन्सी कामाला लागल्या असून उर्वरीत शेतकऱ्यांचे शाश्व्त सिंचनाचे स्वप्न पुर्णत्वास येणार आहे.

येथे क्लिक करा - ‘या’ तीन जिल्ह्यातील प्रकल्पात पावसामुळे समाधानकारक पाणीसाठा...

अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल 

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पध्दतीने कृषीपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने नांदेड परिमंडळातील कृषी वापराकरिता पारेषणविरहीत 9 हजार 105 सौर कृषिपंप स्थापीत करण्याचे निर्धारीत लक्ष्य आहे. त्याअनुशंगाने सौरपंप उभारण्याचे काम ही प्रगतीपथावर आहे.या योजनेमुळे अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत वीजचे स्वप्न पुर्णत्वास येणार आहे.
- दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता ,नांदेड मंडळ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news to farmers: So many farmers in this circle will get electricity during the day nanded news