esakal | गुड न्यूज ; मराठवाड्यातून चार विशेष रेल्वे धावणार
sakal

बोलून बातमी शोधा

train

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीला दुर करण्यासाठी गुरुवारी (ता.२२) रेल्वे विभागाने चार विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यामध्ये २४ ऑक्टोबरपासून धर्माबाद-मनमाड (मराठवाडा एक्सप्रेस) दैनंदिन विशेष रेल्वे धावणार, काचिगुडा-अकोला-नरखेडा, नांदेड-पनवेल आणि परभणी परळी, बिदरमार्गे औरंगाबाद-हैद्राबाद विशेष रेल्वेचा यात समावेश आहे. 

गुड न्यूज ; मराठवाड्यातून चार विशेष रेल्वे धावणार

sakal_logo
By
राजन मंगरुळकर

नांदेड ः मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीला दुर करण्यासाठी गुरुवारी (ता.२२) रेल्वे विभागाने चार विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यामध्ये २४ ऑक्टोबरपासून धर्माबाद-मनमाड (मराठवाडा एक्सप्रेस) दैनंदिन विशेष रेल्वे धावणार, काचिगुडा-अकोला-नरखेडा, नांदेड-पनवेल आणि परभणी परळी, बिदरमार्गे औरंगाबाद-हैद्राबाद विशेष रेल्वेचा यात समावेश आहे. 

लॉकडाउनच्या काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे हळूहळू सुरु होत आहेत. मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना चांगला प्रवास करता यावा यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे यशस्वी पाठपुरावा केला असून उद्यापासुन धर्माबाद - मनमाड (हायकोर्ट), काचिगुडा - अकोला आणि नांदेड - पनवेल या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे पूर्ववत सुरु होत आहेत. 

हेही वाचा - धावती का होईना देवेंद्र फडणवीसांचा औरंगाबाद दौरा, भाजप कार्यकर्त्यांची इच्छा झाली पूर्ण

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला पाठपुरावा  
या निर्णयानुसार महाराष्ट्रातील अनेक भागात रेल्वे सेवा पूर्ववत सुरु होत आहेत. नांदेड आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला. पाठपुराव्यामुळे यापूर्वी काही रेल्वे सुरु झाल्या आता उद्यापासून धर्माबाद - मनमाड (हायकोर्ट), काचिगुडा - अकोला आणि नांदेड - पनवेल या अत्यंत महत्वाच्या रेल्वे पूर्ववत सुरु होत आहेत. या रेल्वे सेवेचा प्रवाशांनी लाभ घेतांना केंद्र सरकाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करावे. 

हेही वाचा - उस्मानाबाद : सामुहिक अत्याचार पीडित मुलगी देतेय मुत्यूशी  झुंज, उपचारासाठी हवेत पैसे

रेल रोको आंदोलन तुर्तास रद्द 
विशेष रेल्वे सुरु करण्यासाठी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने यापुर्वी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आणि बुधवारी ई-सकाळने ‘आंध्र-तेलंगणात शंभर विशेष रेल्वे तर मराठवाड्यात केवळ तीन’ या वृतानंतर रेल्वे विभागाने हा घेतलेला निर्णय प्रवाशांची गैरसोय दूर करणारा आहे. तसेच परभणी येथील रेल रोको आंदोलन तुर्तास रद्द करण्यात आल्याचे मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने कळविले आहे.

२४ ऑक्टोबरपासून धर्माबाद-मनमाड (मराठवाडा एक्सप्रेस) दैनंदिन विशेष रेल्वे धावणार
काचिगुडा-अकोला-नरखेडा विशेष रेल्वे धावणार
आजपासून नांदेड-पनवेल दैनंदिन विशेष रेल्वे धावणार
परभणी परळी, बिदरमार्गे औरंगाबाद-हैद्राबाद विशेष रेल्वे धावणार 
परभणी येथील रेल रोको आंदोलन तुर्तास रद्द करण्यात आल्याचे महासंघाने कळविले