esakal | गुड न्यूज : ऑनलाईन महारोजगार मेळावा, तीन हजार ६५३ विविध कौशल्याच्या जागा रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी एकुण तीन हजार ६५३ विविध कौशल्याच्या जागा रिक्त असून या सुवर्णसंधीचा लाभ पात्र उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

गुड न्यूज : ऑनलाईन महारोजगार मेळावा, तीन हजार ६५३ विविध कौशल्याच्या जागा रिक्त

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय औरंगाबाद यांच्यावतीने ता. सात नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी एकुण तीन हजार ६५३ विविध कौशल्याच्या जागा रिक्त असून या सुवर्णसंधीचा लाभ पात्र उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
 
या मेळाव्यातील विविध रिक्त पदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. टर्नर/ फिटर/ वेल्डर/ मशिनीस्ट/ इलेक्ट्रीकल पदांची संख्या ५०, ट्रेनी प्रोडक्शन इंजिनीअर ३, ट्रेनी इंजिनीअर ५, फिटर ४, टर्नर ६, सुपरवायझर ३०, इलेक्ट्रीशियन (ट्रेनी ॲप्रेंटीस) ४५, वायरमन (ट्रेनी ॲप्रेंटीस) ४५, विमा सल्लागार ५००, कन्स्ट्रक्शन, वेल्डींग, इलेक्ट्रीशियन, हेल्थकेअर, हॉस्पिॲलिटी, प्लंबींग १३०, सिक्युरीटी गार्ड ८५, सिक्युरीटी गार्ड ४०, ट्रेनी ऑपरेटर ६००, वेल्डर/ फिटर/ मशिनीस्ट ५, ट्रेनी ऑपरेटर ५, फिटर/ मशिनीस्ट/ टर्नर/ सीएनसी/ सीओई ३०, ॲप्रेंटीस ट्रेनी ५, ॲप्रेंटीस ट्रेनी ३००, बिजनेस कोऑर्डीनेटर (महिला) २, बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर एक्स्पोर्ट (महिला) २, मशिन ऑपरेटर ४, इलेक्ट्रीशियन २, केमीस्ट (पुरुष) २, वेब डेव्हलपर १, जनॉलिस्ट १, ट्रेनी १००, वेल्डर २, सेल्स मॅनेजर २, एजन्सी लिडर / डेव्हलपमेंट ऑफिसर ८, फायनान्सिअल ॲडव्हायजर १५, इलेक्ट्रीशियन ४, वायरमन ३, अकाउंट ॲण्ड बॅक ऑफिस मॅनेजमेंट ३, इलेक्ट्रीशियन १, इलेक्ट्रॉलिक्स मेकॅनिक १, ट्रेनी १००, सेक्युरीटी गार्ड १००, फिल्ड ऑफिसर ५, सुपरवायझर ५, ट्रेनी ऑपरेटर ५०, कंपनी ट्रेनी १००, वेल्डर २०, फिटर १५, मशिनीस्ट १५, ट्रेनी १००, फिटर/ वेल्डर/ पेंटर/ डिझेल मेकॅनीक १००, जॉब ट्रेनी १००, ट्रेनी ऑपरेटर ५०, ट्रेनी ऑपरेटर ५०, असि. सुपरवायझर २, क्यु. ए. असिस्टंट २, मॅन्युफेक्चरींग केमिस्ट २, ट्रेनी मशिन ऑपरेटर २, ज्यु. ऑफिसर प्रोडक्शन ३, ज्युनिअर आफिसर स्लेटींग ५, एक्सपर्ट लॉजीस्टीक एक्णीकेटीव्ह १, टेक्नीशियन २, इलेक्ट्रीशियन १, इलेक्ट्रीशियन ४, इलेक्ट्रीशियन ४, इलेक्ट्रीशियन २, टेक्नीशियन ५२, ट्रेनी ५००, ट्रेनी १००, सीएनसी ऑपरेटर १२० याप्रमाणे एकुण तीन हजार ६५३ जागा विविध कंपनीत रिक्त आहेत.  

हेही वाचा -  नांदेड : पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरांचे बिऱ्हाड पाठीवर -

www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळ 

सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना आपल्या एम्पलॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन आप्लाय करावे. ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अप्लाय करावे. या मेळाव्यासाठी, जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय ऑटोपार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो इंडस्ट्रिज लि औरंगाबाद, चौगुले इंडस्ट्रिज प्रा. लि. पुणे, महावितरण कार्यालय औरंगाबाद, मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सेक्युरिटी ॲण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडीया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली, विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स उस्मानाबाद, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग औरंगाबाद, सेंसीव्ह एज्युकेशन लि. पुणे व श्री साई रिसर्च लॅब इ. नामांकिंत उद्योजकांनी १९०२ ऑनलाईन रिक्तपदे अधिसुचित केलेली आहेत.

याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क करावा. तसेच जॉब व्हॅकेंसीज बाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते तरी उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.