esakal | Good News : नांदेड जिल्ह्यातील " या " गावात लेकी- सुनांच्या नावे लावले घरावर फलक 

बोलून बातमी शोधा

file photo

महिलादिनी चिंचोली ग्रामपंचायतीने घरे नावे करुन महिलांचा केला सन्मान 

.

Good News : नांदेड जिल्ह्यातील " या " गावात लेकी- सुनांच्या नावे लावले घरावर फलक 
sakal_logo
By
गणेश ढेपे

मारतळा (जिल्हा नांदेड) :  महिलांच क्षेत्र हे केवळ " चुल अन् मुल एवढ " मर्यादित नसून आजची स्री ही पुरुषांच्या बरोबरीन विविध क्षेत्रात काम करत आहे. तेव्हा महिला ही अबला नसुन, कतृत्वाने त्या सबला बनल्या आहेत. त्यामुळे केवळ एक दिवसच महिलादिनी त्यांचा सन्मान न होता समाजात मान मिळावा यासाठी चिंचोली ग्रामपंचायतीने पुढाकार घेत केवळ पोकळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करत गावातील घरावर " लेकी- सुनां "  च्या नावे फलक लावून अनोखा महिलादिन साजरा करण्यात आला.

लोहा तालुक्यातील चिंचोली या छोट्या गावात महिला दिनाचे औचित्य साधून प्रथमच अनोखा उपक्रम राबवत गावातील घराच्या दरवाज्यावर नेहमी आपण पुरुष प्रमुख कुटूंबाच्या नावाचे फलक पाहत आलो. मात्र चिंचोली येथील सरपंच गोविंदराव जाधव यांनी आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना ही कल्पना सांगितली व ती सर्वांनाच आवडली. महिलांच क्षेत्र हे केवळ "चुल अन् मुल "  इतकच मर्यादित नाही, तर आजची महिला ही विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत सक्षम बनली असून तीचा समाजात मान वाढला पाहिजे. यासाठी शासकिय योजना व बचत गटाच्या माध्यमातून व अर्थसाह्याने लघु उद्योग करत आहेत.

हेही वाचाGood News : नांदेडची विद्यार्थीनी योगिता शाह हिची मंगळ ग्रह मोहिमेत गगनभरारी..

त्यासाठी आपण त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत, घरे मुलींच्या नावे केल्यामुळे करातही सुट मिळत असुन महिलांचा सन्मान होत असल्याने सर्वजन तयार झाले. महिलादिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात नारीशक्तीचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला व सदर अनोखा उपक्रम राबवत गावातील घरावर लेकी- सुनांच्या नावाचे फलक तयार करुन लावले. यावेळी उपसरपंच गोविंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य माधव जाधव, केशव पाटील, एकनाथ जाधव, सुमनबाई जाधव आदीची प्रमुख उपस्थिती होती.

हा उपक्रम लेकीबाळीसाठी प्रेरणादायी असून, त्यातून मूलींना स्वत : बद्दल सुरक्षीतता वाटून समाजामध्ये मुलींप्रती एकवेगळी जाणिव निर्माण होईल यांचा मला मनस्वी आनंद आहे.
- मणिषा वावरे, ग्रामसेविका, चिंचोली.

घर व कुटुंबासाठी महिला सतत काबाडकष्ट करत असतात. स्वत: च्या नावे घर असाव अस त्यांच स्वप्न असत. मात्र खेडेगावात तस होत नाही. पण आम्ही गावकऱ्यांनी  सत्यात आणुन महिलांचा सन्मान वाढवला आहे.
- गोविंदराव जाधव, सरपंच, चिंचोली.

संपादन- प्रल्हाद कांबळे