विद्यार्थ्याना गुड न्यूज :  नांदेड जिल्‍ह्यातील सायबर कॅफे शनिवार, रविवार सुरु राहणार

प्रल्हाद कांबळे
Saturday, 8 August 2020

विद्यार्थ्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सायबर कॅफे चालू असणे गरजेचे असल्‍याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्‍हयातील सर्व सायबर कॅफे यांना शनिवारी व रविवारी सुद्धा सकाळी सात ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत अटी व शर्तीच्‍या अधीन राहून चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.   

नांदेड : इयत्‍ता दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्‍यांना पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेश प्रक्रियेतील आपली माहिती देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेनुसार पुढील आवडीच्या क्षेत्रात प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी त्यांना सायबर, इंटनरनेट कॅफेवर येऊन ऑनलाईन अर्ज केल्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. विद्यार्थ्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सायबर कॅफे चालू असणे गरजेचे असल्‍याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्‍हयातील सर्व सायबर कॅफे यांना शनिवारी व रविवारी सुद्धा सकाळी सात ते           सायंकाळी पाचवाजेपर्यंत अटी व शर्तीच्‍या अधीन राहून चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.   

जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे संदर्भ क्र. एक अन्‍वये नमूद आदेशान्‍वये नियमावलीसह ता. ३१ जुलैपर्यंत नांदेड जिल्‍ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्‍या अधिन राहून आस्‍थापना व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत चालू ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली होती.

राज्‍यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बध सुकर

शासनाचे आदेश ता. २९ जुलै नुसार राज्‍यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बध सुकर करण्‍यासह नियम व अटीच्‍या अधिन ताळेबंदीचा कालावधी ता. ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून मार्गदर्शक सूचना, निर्देश निर्गमित केले आहे. त्‍यानुसार या कार्यालयाचे संदर्भात नमूद आदेश ता. ३० जुलै अन्‍वये संदर्भात नमूद या कार्यालयाचे आदेश ता. १९ जुलै मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करून संपूर्ण नांदेड जिल्‍ह्यात ता. ३१ जुलै नंतर ताळेबंदीचा कालावधी पुढील आदेशापर्यंत वाढविण्‍यात आला आहे.

हेही वाचा -  कोरोना : नांदेड महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी असुरक्षीत, विना सुरक्षेशिवाय राबतायत हात

विद्यार्थ्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सायबर कॅफे चालू असणे गरजेचे

इयत्‍ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्‍यांना पुढील शिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीयेव्‍दारे प्रवेश घेण्‍यासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु झालेली आहे. तथापि जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे संदर्भीय आदेशान्‍वये नांदेड जिल्‍हयात सोमवार ते शुक्रवार विहीत वेळेत दिलेल्‍या अटी व शर्ती नुसारच दुकाने व खाजगी आस्‍थापना सुरु ठेवण्‍यास मुभा आहे. परंतू विद्यार्थ्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी सायबर कॅफे चालू असणे गरजेचे असल्‍याने नांदेड जिल्‍हयातील सर्व सायबर कॅफे यांना शनिवार व रविवारी सुध्‍दा चालू ठेवण्‍यासाठी परवानगी देणे आवश्‍यक होते, असेही आदेशात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for students: Cyber cafe in Nanded district will be open on Saturday and Sunday nanded news