शासकीय आयुर्वेद महाविद्यालय झाले थकबाकी मुक्त; चालू देयकासह 21 लाख रुपये थकीत बीलाचा केला भरणा

file photo
file photo
Updated on

नांदेड : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महावितरणने मार्चअखेर थकबाकी वसुलीकरिता आता महानगरपालिका व नगरपालिकांकडे असलेल्या पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकी वसुलीबरोबरच शासकीय आस्थानपाकडे असलेल्या थकबाकी वसुलीच्या दृष्टीने पाठपुरावा सुरु केला आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाने चालू देयकासह 21 लाख 60 हजार रुपयांची थकबाकी भरुन वीज बील कोरे केले आहे.

नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांनी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधीष्ठाता प्रा. डॉ. वाय. आर. पाटील यांच्याकडे वारंवार विचारणाकरुन थकीत बील भरण्याबाबत आग्रह धरला होता. डॉ. पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी अभियंता जे. एल. चव्हाण आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री भुसारी यांना आज 21 लाख 60 हजाराचा धनादेश सुपुर्द केला. याकामी सहायक अभियंता धैर्यशील देशमूख यांनी परिश्रम घेतले.

येणारा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी माझे बील माझी जबाबदारी या भावनेतून थकबाकी असलेल्या सर्व वीजग्राहकांनी आपले वीजबील वेळेत भरुन महावितरणला सहकार्य करावे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही योग्य ती खबरदारी घेत महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी आपल्यादारावर येत असून वीजबील भरुन त्यांना सहकार्य करावे. वीजग्राहकांना अखंडीत वीज सेवा देणे हीच आमची आग्रही भुमिका आहे. आपण ही आपले कर्तव्य पार पाडत वीजबील भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com