शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन तत्पर.....कोण म्हणाले ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन (ता. एक) जुलै या त्यांच्या जन्म दिवसानिमित्ताने शासनातर्फे कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

नांदेड : राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी नैसर्गिक हवामानासह त्यांना चांगल्या बियाणांची आणि उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. यासाठी शासन कटिबद्ध असून वेळोवेळी शेतकऱ्यांसमोरील जी काही आव्हाने येतात. त्यातून सावरण्यासाठी शासन प्रयत्नशील राहिले आहे, असे सांगून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना चांगल्या खरीप हंगामाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा....नांदेडकरांनो गर्दी केली तर समुह संसर्गाचा धोका वाढणार!

वसंतराव नाईक यांचे योगदान महत्वाचे
राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन (ता. एक) जुलै या त्यांच्या जन्म दिवसानिमित्ताने शासनातर्फे कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यालयीन पातळीवर हा दिवस साजरा होण्यासमवेतच तो शेतकऱ्यांच्या समवेत बांधा - बांधावर आता साजरा होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचलेच पाहिजे.....मासे वाहतूक नावालाच अन् निघाला गुटखा

शेतकऱ्यांना खूप काही सोसावे लागले
यावर्षी मागील चार महिन्यांच्या कालावधीत सर्वांसोबत कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांनाही खूप काही सोसावे लागले आहे. या आव्हानात्मक काळात शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पूर्वतयारी केली. काही शेतकऱ्यांनी इतर पिकांसमवेत सोयाबीनची लागवड केली. यातील काही शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवू न शकल्याने मोठे नुकसान झाले. यासाठी चौकशी सुरू असून दोषी कंपन्यांविरुद्ध लवकरच कारवाई करू, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून या कृषी दिनापासून शेतकरी बांधवांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

‘डॉक्टर्स डे’ निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन  
नांदेड : जिल्ह्यात ता. एक जूलै हा दिवस ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ता. एक जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत भवन येथे सकाळी अकरा वाजता  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तीनशे रक्तदाते उत्स्फुर्त रक्तदान करतील अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग व कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government is ready for the development of farmers ..... read who said