
माहूर : जनजातीय गौरव वर्षानिमित्त आयोजित धरतीआबा जनभागीदारी अभियानाला तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी येथून मोठ्या उत्साहात सुरवात करण्यात आली. तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी समाजाच्या हितासाठी विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.