Govt Polytechnic Nanded : शासकीय तंत्रनिकेतनचा जेफ्रॉन इंडिया’सोबत करार; विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाची संधी
Industrial Training : शासकीय तंत्रनिकेतन नांदेडने जेफ्रॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. यामुळे विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
नांदेड : शासकीय तंत्रनिकेतन नांदेडच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाने ''जेफ्रॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'' या कंपनीसोबत सामंजस्य करार करून अद्ययावत प्रयोगशाळा उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.