पदवीधर निवडणूक- कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट येथील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रात बदल

प्रल्हाद कांबळे
Thursday, 26 November 2020

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत इयत्ता दहावीच्या विज्ञान तंत्रज्ञान-1 या विषयाच्या मनोविकास विद्यालय कंधार ऐवजी मनोविकास प्राथमिक विद्यालय, एसबीआय एटीएमजवळ कंधार नवीन परीक्षा केंद्र राहिल.

नांदेड  :- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकानिमित्त ता. 1 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील निवडक ठिकाणी जी मतदान केंद्र देण्यात आली आहेत त्या मतदान केंद्रांवर चार ठिकाणी दहावी व बारावीच्या परीक्षांची केंद्र देण्यात आली होती. निवडणुकांचा कालावधी व स्वरुप लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट या ठिकाणच्या परीक्षा केंद्रात केवळ एक दिवसासाठी पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.

 

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत इयत्ता दहावीच्या विज्ञान तंत्रज्ञान-1 या विषयाच्या मनोविकास विद्यालय कंधार ऐवजी मनोविकास प्राथमिक विद्यालय, एसबीआय एटीएमजवळ कंधार नवीन परीक्षा केंद्र राहिल. श्री शिवाजी विद्यालय पानभोसी रोड कंधार ऐवजी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी रोड कंधार तर श्री शारदा भुवन हायस्कुल, जुनामोंढा नांदेड ऐवजी गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय गाडीपुरा बालाजी मंदीराजवळ नांदेड हे नवीन परीक्षा केंद्र राहिल.

 

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वा. ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत इयत्ता बारावीच्या गणित व संख्याशास्त्र या विषयाची महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा ता. किनवट या परीक्षा केंद्रा ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विदयालय, उत्तर प्रवेशद्वार (मस्जिदच्या बाजूने) गोकुंदा ता. किनवट हे नवीन परीक्षा केंद्र असेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduation Election- Changes in 10th and 12th examination centers at Kandhar, Nanded and Gokunda Kinwat nanded news