आजीला बांधून केली मारहाण; दीड लाखांचा ऐवज लंपास | Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार रवी मुंडे करत आहेत.

आजीला बांधून केली मारहाण; दीड लाखांचा ऐवज लंपास

नांदेड : जिल्ह्यात खानापूर (deglur) येथे एका आजीला हात पाय बांधून लाकडाने मारहाण करून तिच्या व आणखी एक महिलेच्या अंगावर दागिनांच्या जबरी चोरी(thief) केली. तसेच दुसऱ्या घटनेत सवना (ता. हिमायतनगर) येथे घरफोडी करून चोरट्यांनी ६३ हजाराचा ऐवज लंपास केला.नवी आबादी खानापूर पाण्याच्या टाकीजवळ आणि हनुमान मंदिराच्या पाठीमागे ईब्राहिम रस्ताच्या बाजूला व्यकंटी तुकाराम कैकाडी (वय ३२) या शेतकऱ्याच्या घरात गुरूवारी (ता. सहा) चोरटा शिरला. घरातील आजीचे हात पाय व तोंडाला रुमाल बांधून मारहाण केली.

हेही वाचा: नांदेडकर दक्ष अन् प्रशासन सज्ज

आवाज करू नको, असे म्हणून तिच्या कानातील २० हजाराच्या पाच ग्रॅमच्या सोन्याच्या काड्या, दोन्ही पायातील २० हजाराचे ४० तोळे चांदीचे वाळ्याचे जोड, दोन्ही हातातील दहा हजाराचे २० तोळे चांदीचे दंडकडे तसेच दोन्ही हातातील चांदीचे पाच हजाराचे दहा तोळ्याचे दोन गोट असा एकूण ६७ हजाराचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. त्यानंतर निर्मलाबाई एकनाथ ढगे यांच्या गळ्यातील १२ हजाराचे तीन ग्रॅमचे मनीमंगळसुत्र असा एकूण ७९ हजाराचा ऐवज जबरीने चोरून नेला. याबाबत देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार रवी मुंडे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत सवना (ता. हिमायतनगर) येथील राजू ग्यानोबा पंडीत (वय ४८) यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून चोरटे आत शिरले. कपाटात ठेवलेले ६३ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याबाबत हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार राठोड करत आहेत.

Web Title: Grandmother Tied Up And Beaten Robbery 15 Lakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nandedcrimerobbery
go to top