जिल्हाभरातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन 

शिवचरण वावळे
Sunday, 3 January 2021

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आयटीआय येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना, शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवादन केले.

नांदेड - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आयटीआय येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना, शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आयटीआय परिसरात रांगा लावल्या होत्या. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. तीन) आयटीआय येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, महापौर मोहिनी येवनकर, सभापती बि. जी. गाडीवाले, बालाजी जाधव उपस्थित होते. 

हेही वाचा- नांदेडमध्ये जबरी चोरीतील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक, एका महिलेचा आहे समावेश

शिवसेना पक्षाच्या वतीने अभिवादन

शिवसेना पक्षाच्या वतीने रविवारी आयटीआय येथील सावित्रिबाई फुले यांच्यापूर्णाकृती पुतळ्यास नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदा बोंढारकर, उमेश मुंडे, मंगेश कदम, श्याम वानखेडे, मुन्ना जोरगेवार. 

प्रजासत्ता पार्टीकडून अभिवादन

प्रजासत्ता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी रविवारी सावित्रिबाई फुले यांच्यापूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी पी.एस. गवळे, नंदकुमार बनसोडे, बालाजी मोरे, जमदाडे, रवी कांबळे, गौतम मस्के, पुंडलीक कदम व प्रशांत लांडगे. 

सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने 

आयटीआय चौकातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी वंदना गुंजकर योगिता शिंदे सुनीता गुंजकर अर्चना जाधव सीमा देशमुख आशा वैद्य केएम जाधव प्राध्यापक लक्ष्मण शिंदे आधी 

हेही वाचा- नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अखेर मुहुर्त, सोमवारपासून प्रक्रिया ​

मराठा सेवा संघ - जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने  अभिवादन

सावित्रीबाई फुले यांना रविवारी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करताना प्रा. डॉ. गणेश शिंदे, संजय लोंढे, शिवाजी काजळकर, प्रा. रामकृष्ण होंगे, प्रतिभा पाटील खतगावकर, महानंदा पवळे, विजया पाटील, रेणुका इंगोले, ज्योती शिंदे, मीनाक्षी जाधव. 

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. रेणुका मोरे, गजानन माने, मुक्ताई पवार, कल्पना इंगळे, ज्योती शिंदे, सुनील पाटील, कदम तिरुपती पाटील, शैलेश पाटील, अविनाश पाटील, श्रीनाथ साखरे. 

लसाकमच्या वतीने अभिवादन

क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांना रविवारी अभिवादन करताना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले डॉक्टर अशोक हजारे शिवा कांबळे, शंकर नामवाडे, शिवाजी टोम्पे. नामदेव वाघमारे बालाजी गवाले, 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greetings to Krantijyoti Savitribai Phule from all over the district Nanded News