esakal | मुदखेड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस अभिवादन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदय सम्राट, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ता.१७ रोजी मुदखेड येथील बाळासाहेब ठाकरे चौक येथे बाळासाहेब ठाकरे चौकाच्या नामफलक व प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

मुदखेड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस अभिवादन

sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदय सम्राट, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ता.१७ रोजी मुदखेड येथील बाळासाहेब ठाकरे चौक येथे बाळासाहेब ठाकरे चौकाच्या नामफलक व प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

मुदखेड तालुका व शहर शिवसेना शाखेच्यावतीने बाळासाहेब ठाकरे चौकांमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, बारड सर्कलचे बाळासाहेब देशमुख बारडकर, प्रल्हाद इंगोले, गटनेते तथा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष माधव पाटील कदम, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणरावजी देवदे, बाजार समितीचे संचालक संदीप पाटील गाडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांसह काँग्रेसचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा नांदेड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले -
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बालाजी पा.कल्याणकर, मुदखेड तालुका प्रमुख संजय कुरे, शहरप्रमुख सचिन चंद्रे, सचिन माने, सुरेश शेटे, विश्वंभर नितीन गोडसे, पिन्टू पाटील वासारीकर, गोविंदराव शिंदे वाईकर, सुधाकर सूर्यवंशी, गंगाधर पा.मगरे, संजय पा.गाढे, बालाजिराव शिंदे, पवन अटकलवार, सोनू आरेपल्लू, पंजाब पाटील मुंगल, आनंदराव जाधव, दिपक पाटील, अंकुश मामिडवार, कैलास गोडसे,नगरसेवक रावसाहेब चौदंते, ऋषिकेश पारवेकर,संदीप मोडवान, माधव पा.वडगावकर, सतीश देशमुख, नितीन गोडसे यासह तालुक्यातील शिवसैनिक व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन-  प्रल्हाद कांबळे