esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded : पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली नुकसानीची पाहणी

Nanded : पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली नुकसानीची पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना धीर देऊन या संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. एक) दिली.

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव, बेलसर, लोणी, लहान, आंबेगाव आदी गावातील शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. ‌‌अर्धापूर तालुक्यातील मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटाका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून‌ नेला आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी श्री. चव्हाण यांनी संवाद साधला. पिंपळगाव महादेव येथील युवक गावाजवळून जाणाऱ्या मेंढला नाल्याला आलेल्या पूरात वाहुन गेला होता. खरिपाच्या पिकांना खूप मोठा फटाका बसला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पालकमंत्री चव्हाण यांच्यासोबत आमदार मोहन हंबर्डे, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेटे, प्रवीण देशमुख, पप्पू कोंडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. पिंपळगाव महादेव, बेलसर, लोणी, लहान, आंबेगाव आदी गावातील नागरिकांनी, लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडून तातडीने मदत देण्याची मागणी केली. तसेच ही मदत सरसकट देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी आनंद कपाटे, आनंदराव पाटील बेलसरकर, संजय लोणे, अमोल इंगळे, शेख महेबुब, डॉ. उत्तम इंगळे, सुधाकर इंगळे, सतीश देशमुख लहानकर, कपील दुधमल, उपसरपंच उध्दव कल्याणकर, सदाशिवराव देशमुख, संतोष कल्याणकर, वसंतराव देशमुख, आदी पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.

पीकविमाबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी

दरम्यान, पिंपळगाव महादेव, लोणी, लहान, आंबेगाव आदी भागातील शेतकऱ्यांची भेट घेऊन पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे पिक विम्या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्यावर श्री. चव्हाण यांनी पिक विमा हा केंद्र सरकारचा विषय आहे. त्यात शेतकऱ्यांना याचा फायदा किती होईल याबदल मी स्वतः लक्ष देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली.

loading image
go to top