मार्गदर्शन सेवा केंद्राच्या माध्यमातून पीडित ग्राहकांना न्याय मिळवून देणार- डॉ. विजय लाड

file photo
file photo

नांदेड : देव देवळात नसून सर्वसामान्य पीडित जनसामान्यांच्या सेवेत, देवाचा सहवास लाभतो. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या या परमपवित्र मुहूर्ताच्या अनुषंगाने ऊर्जा घेऊन ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी, पीडित ग्राहकांच्या शोषणमुक्तीसाठी स्वतः ला या जनसेवेत झोकून देऊन ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राच्या माध्यमातून पीडित ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले.

ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अधिष्ठान, आराध्य दैवत, स्वामी विवेकानंद यांची जयंती मंगळवारी (ता. १२) चिखलवाडी येथील सिताराम मंदिरात नांदेड शाखेतर्फे साजरी करण्यात आली. सदरील कार्यक्रमात स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड व प्रबोधनप्रमुख प्रा. डॉ. बा. दा. जोशी यांच्या हस्ते झाले.  तसेच उपस्थित सर्वांतर्फे स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

स्वामी विवेकानंदाच्या चरित्रावर आधारीत प्रसंग सांगून स्वामी विवेकानंदाना, आराध्यदैवत मानणार्‍या, संघटनेचे प्रेरणास्थान, ग्रहकतीर्थ बिंदु माधव जोशी, यांनी दाखवलेल्या मार्गानुसार ‘लक्ष पर पहुंचे बिना, पथ मे पथिक विश्राम कैसा’या उक्तीनुसार संघटना न थांबता अविरत मार्गक्रमण करीत राहणार असा विश्वास जिल्हा संघटक बालाजी लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला. संघटनेचे प्रबोधनप्रमुख प्रा. डॉ. बा. दा. जोशी, जिल्हा अध्यक्ष अरविंद बिडवई, महानगर संघटक प्रशांत वैद्य, महानगर सचिव इंजि. रमेश अहिरे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रथेनुसार संघटनेच्या वर्षभरातील उपक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांतर्फे यथाशक्ती आर्थिक समर्पण करण्यात आले.

सध्याची कोरोना संकटाची पार्श्वभूमी पहाता सर्व ती काळजी घेऊनच सदरील कार्यक्रम संपन्न झाला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास महानगर अध्यक्ष रंगनाथ उंबरकर, महानगर सहसंघटक बाळासाहेब पानसे, तालुका सदस्य पुरुषोत्तम जकाते, पुष्पा संगारेड्डीकर, अ‍ॅड. विना पोत्रेकर - शेवडीकर, श्री देवीदास पांडे यांची उपस्थिती होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com