Video - गुरुद्वारा लंगरसाहिब देना बॅंक चौक वाहतुकीसाठी खूला 

file photo
file photo

नांदेड : कोरोनाच्या पाश्वभूमीवर लंगर साहिब गुरुद्‍वारा ते सचखंड गुरूद्वारा हा रस्ता व देना बॅक चौक परिसर प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेनमेन्ट झोन) घोषीत करण्यात आला होता. मात्र पाचव्या लॉकडाउनमध्ये काही भागात शिथीलता देण्यात आली होती. लंगरसाहिब व देना बॅंक परिसरातील कन्टेनमेन्ट झोनमधून वगळावा अशी मागणी संत बाबा बलविंदरसिंग यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार शनिवारी (ता. १३) पासून हा मार्ग वाहतुकीसाठी खूला केला आहे. तसेच या भागात काही आस्थापना सुरू झाल्या आहेत.  

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध देशभरात लॉकडाउन सुरू आहे. सुरवातीच्या काळात कोरोनाची धास्ती व प्रशासनाला करावी लागणारी कसरत लक्षात घेता ज्या भागात एक कोरोना बाधीत रुग्न आढळाल तर तो परिसर कन्टेनमेन्ट झोन जाहीर करण्यात येत होता.

त्याच पद्धतीने गुरुद्वारा लंगरसाहिब परिसरातील काहींना कोरोनाची लागन झाली होती. त्यानंतर प्रशासनाने हा परिसर कन्टेनमेन्ट झोन जाहीर केला. जवळपास ६० दिवस झाले तरी हा प्रतिबंधीत झेत्र काढण्यात आला नसल्याने येथील काही दुकानदार, समाजातील प्रतिष्ठीत आणि संत बाबा बलविंदरसिंग आणि गुरूद्वारा बोर्डाचे सचीव रविंदरसिंग बुंगई यांची मागणी होती.
 
देना बॅक चौक वाहतुकीसाठी खुला

सुरवातीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ही मागणी फेटाळली. त्यानंतर पुन्हा या भागात दोन महिण्यापासून एकही कोरोनाबाधीत रुग्ण सापडला नसल्याने आता तरी हा भाग कन्टेनमेन्ट झोनमधून काढा अशी विनंती पुन्हा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी बैठक घेऊन नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यासमवेत देना बँक चौक परिसरात गेले. तेथे संत बाबा बलविंदरसिंग यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा परिसर खूला करण्यात आला. एवढेच नाही तर या भागातील छोटी मोठी दुकानेसुद्धा काही प्रमाणात सुरू करण्यात आली. 

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे 

शहरात दिवसेंदिवस कन्टेनमेन्ट झोन वाढत असल्याने प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. रुग्नसंख्या ही सव्वादोनशेच्यावर गेली असून दररोज नवीन भागातील रुग्ण कोरोना बाधीत आढळून येत आहे. अनलॉक झाल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. नागरिकही नियमीत शहरात कामाशिवाय फिरत असल्याचे पहावयास मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा करणे प्रशासनाचे कर्तव्य जरी असले तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com