अडीच लाखाचा गुटखा जप्त- पोलिस व एफडीएची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

एका गोदामातून दोन लाख ५० हजार ५०० रुपयाचा बंदी असलेला गुटखा जप्त केला. यावेळी या पथकानी तिन गुटखा माफियांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (ता. २२) दुपारी करण्यात आली. 

नांदेड : लॉकडाउनचा फायदा काही अवैध व्यवसाय करणारे घेत असून असाच एक प्रकार शहरातील देगलूर नाका भागात उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासन आणि विशेष पोलिस महानिरिक्षक यांच्या पथकाच्या संयुक्त पथकाने एका गोदामातून दोन लाख ५० हजार ५०० रुपयाचा बंदी असलेला गुटखा जप्त केला. यावेळी या पथकानी तिन गुटखा माफियांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (ता. २२) दुपारी करण्यात आली. 

देगलूरनाका परिसर हा अवैध धंद्यासाठी पोलिस दप्तरी रेड स्पॉट असल्याचे सांगण्यात येते. या भागात अवैध दारु, गुटखा, मटका आणि जुगार मोठ्या प्रमाणात चालतो. हा परिसर तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत विभागला गेल्याने पोलिसही तेवढे तिकडे लक्ष देत नाहीत. एकमेकाकडे बोट करून आपलेही उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानतात. मात्र ही तक्रार विशेष पोलिस महानिरीक्षक यांना समजताच त्यांनी स्वत: लक्ष घातले. या अवैध धंद्याचा नायनाट करण्यासाठी त्यांनी आपल्या पथकाला सतर्क केले. 

हेही वाचा कोरोना अपडेट : नांदेडमध्ये आज तीन पॉझिटिव्ह, संख्या गेली ११९ वर

दोन लाख ५१ हजार ५०० रुपयाचा साठा जप्त 

अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने या पथकाने देगलुर नका परिसरात असलेल्या जनता जर्दा स्टोअर्स या गोदामावर कारवाई केली. पथकाच्या हाती अडीच लाखाचा गुटखा सापडला. हा गुटखा साठा मागच्या काही दिवसांपासून सुरू काळ्या बाजारात जात होता. पथकानी या गोदामातून वेगवेगळ्या १२ प्रकारचा गुटखा, तंबाखू व तंबाखूजन्य साठा हस्तगत केला. या मालाची अंदाजे किंमत दोन लाख ५१ हजार ५०० रुपये असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी दिली.

नांदेड न्यायालयात हजर करणार

या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात मोहमद परवेज मोहमद युनूस, सय्यद अली व मोहमद अझीम मोहमद इकबाल या आरोपीविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करुन त्यांना रात्री अटक केली. त्यांना शनिवारी (ता. २३) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे प्रविण काळे यांंनी सांगितले. यापुढेही गुटखा विरोधी कारावया सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutka worth Rs 2.5 lakh seized Police and fDA take action nanded news