मासे वाहतूक नावालाच अन् निघाला गुटखा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

पोलिसांच्या माहितीनुसार यातील बोलेरो पिकअप वाहन (क्र. एम. एच.२६ बी.ई. ५६१०) या वाहनातून भालकी जिल्हा बिदर (कर्नाटक) येथून नांदेडकडे गुटखा जात असल्याची माहिती मरखेल पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्यासह पोलिस कर्मचारी शब्बीर शेख, संजय बरबडेकर, विष्णुकांत चामलवाड, गजानन जोगेपेठे, सूर्यवंशी व अन्य कर्मचाऱ्यांनी पाळत ठेऊन दावणगीर- लोणी रस्त्यावरील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अडवून पाहणी केली असता त्यामध्ये विमल नावाचा गुटखा असल्याचे आढळून आले. 

मरखेल, (ता.देगलूर, जि. नांदेड) ः मासे वाहतुकीच्या नावाखाली गुटखा वाहतूक करण्याचा गोरखधंदा करणाऱ्या एका चारचाकी वाहनाची पोलिसांनी झडती घेत त्याच्याजवळील सुमारे दोन लाखांचा विमल नावाचा गुटखा व चारचाकी बोलेरो पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मरखेल ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी ही कार्यवाही मंगळवारी (ता.३०) रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दावणगीर येथील ग्रामपंचायतीजवळ केली. 

हेही वाचा -  आंतरजिल्हा एसटी​ बस वाहतुकीत नांदेड राज्यात प्रथम -

पोलिसांच्या माहितीनुसार यातील बोलेरो पिकअप वाहन (क्र. एम. एच.२६ बी.ई. ५६१०) या वाहनातून भालकी जिल्हा बिदर (कर्नाटक) येथून नांदेडकडे गुटखा जात असल्याची माहिती मरखेल पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्यासह पोलिस कर्मचारी शब्बीर शेख, संजय बरबडेकर, विष्णुकांत चामलवाड, गजानन जोगेपेठे, सूर्यवंशी व अन्य कर्मचाऱ्यांनी पाळत ठेऊन दावणगीर- लोणी रस्त्यावरील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अडवून पाहणी केली असता त्यामध्ये विमल नावाचा गुटखा असल्याचे आढळून आले. 

गुटखा माफियाची नवीन शक्कल
दरम्यान कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदी काळात या वाहनचालक व गुटखा माफियाने नवीन शक्कल लढवून मासे विक्रीचा कारभार दाखवत वारंवार या भागातून गुटखा वाहतूक केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या नवीन पराक्रमामुळे संचारबंदी काळात हणेगाव याठिकाणी लावण्यात आलेल्या पोलिस चौकीत कार्यरत कर्मचाऱ्यांना देखील गुटखा वाहतुकीची शंका आलेली नाही. आज देखील हे वाहन पोलिस चौकी ओलांडून मरखेलकडे रवाना झाले होते.

संचारबंदी काळातही वाहतूक
दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक व विक्री केली जात आहे. संचारबंदी काळातही राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला आदींची वाहतूक केली गेली. एकट्या जून महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाहीत (ता.सहा) जून रोजी केलेल्या कार्यवाहीत ३१ हजारांचा गुटखा व एक मोटारसायकल सुभाषनगर याठिकाणी ताब्यात घेतली होती. तर (ता.२३) जून रोजी केलेल्या कार्यवाहीत साठ हजारांचा सागर गुटखा व ४५ हजार रुपये किमतींचा ऑटो ताब्यात घेत दोघांवर कार्यवाही केली होती. 

उपरोक्त दोघांवर गुन्हा 
आज पकडण्यात आलेल्या वाहनात १ लाख ९४ हजार तीनशे साठ रुपये किमतीचा विमल पानमसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखू व चार लाख रुपये किमतीचे वाहन असा पाच लाख ९४ हजार तीनशे साथ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून वाहनचालक मधुकर रमण मुधोळकर (रा. इतवारा, शांतीनगर नांदेड) यांच्यासह शेख वहाज शेख सिराज (रा. पूर्णा जिल्हा परभणी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. अन्न व औषधी प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी सुनील जिंतूरकर यांच्या फिर्यादिवरून मरखेल पोलिसांनी उपरोक्त दोघांवर गुन्हा नोंदविला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha Transport Under The Name Of Fish Transport, Nanded News