माहुरात मोठी कारवाई! गुटखा,शस्त्रांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

file photo
file photo
Updated on

माहूर (जि.नांदेड) : शहरातील (Mahur) बसस्थानक चौकातील गौसिया फर्टिलायझर्स समोर बुधवारी (ता.२२) पहाटे एकच्या सुमारास पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही चारचाकी (Nanded) वाहन अडवून पाहणी केली असता त्यात गुटखा व घातक शस्त्रे आढळून आल्याने थोड्यावेळासाठी पोलीस ही गांगरले होते. माहूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून (Crime In Nanded) पोलीस अधीक्षक यांना स्पेशल रिपोर्ट पाठविला आहे. गुटखा, मटका व जुगार आधी बेकायदेशीर धंदे माहूर गडाच्या माळरानात बिनदिक्कतपणे सुरू असतात. हे सर्वश्रुत आहे. परंतु अध्यात्मिक व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माहूर शहरात सशस्त्र व गुटखा तस्करीची ही घटना पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. मध्यरात्रीचे काळोखात संशय येणार नाही, अशा किमती वाहनांमध्ये सशस्त्र व गुटखा तस्करी ही कल्पना देखील कोणी केली नसावी. अशा घटनांमुळे शहरात सहज घडत असल्याची प्रचिती आज माहूरकरांना आली आहे.

file photo
नांदेडकरांनी सोडला सुटकेचा निःश्वास! फक्त एक जण कोरोनाबाधित

बसस्थानक चौकातील गौसिया फर्टीलायझर समोर पोलिसांना गस्त घालत असताना संशयित वाहन आढळून आले. अधिक पाहणी केली असता वाहनामध्ये नायलॉनच्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यात एक लाख 56 हजार रुपये किमतीचा पान मसाला, एकतीस हजार दोनशे रुपये किमतीचे सुगंधित तंबाखू, सत्तावण्ण हजार रुपये किमतीचे सुगंधी पानमसाला, चौदा हजार रुपये किमतीचे सुगंधी तंबाखू, पंधरा लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही चारचाकी वाहन असा एकूण सतरा लाख 59 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. शिवाय मानव जीवितास घातक सुरा, खटक्याचा चाकू मिळून आले तर आरोपी माहूर शहरातील सोनापीर दर्गा परिसरात राहणाऱ्या बाबर अहमद शेख फकीर महंमद याचा आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांनी झडती दरम्यान जप्त केले आहे. आरोपीचा शोध सध्या पोलिस घेत असून सदरची कारवाई पोलिस निरीक्षक नामदेव रिठे, सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पोलिस हेडकॉन्स्टेबल आनंद राठोड, साहेबराव सगरोळीकर, चालक रामचंद्र दराडे व छगन जाधव यांनी केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत माहूर पोलिसांनी भारतीय दंड विधानसह अन्नसुरक्षा व मानके अधिनियम 2006 व तसेच शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्याकडे देण्यात आलेला आहे. घटनेतील प्रमुख आरोपी सध्या फरार असून या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान आहे तर या घटनेत शहरातील अजून किती जणांचे हात काळे झालेले आहेत. ते तपासानंतर समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nanded
Turning Grief into Determination: Abhimanyu Cracks MPSC Revenue Assistant Exam
Police Raid Grocery Store, Trace Larger Gutkha Stock Worth Lakhs in Nanded City
Mother’s hard work and son's determination lead to PSI success
Marathi News Esakal
www.esakal.com