Nanded Crime: शिवपुरीच्या तरुणाचा खून नसून विषप्राशन करून संपवले जीवन
Nanded News: हदगावातील शिवपुरी येथील दयानंद कदम याचा मृत्यू खून नसून विषप्राशनातून असल्याचे जीवन संपवल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. देहावरील खुणांमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करत घटनास्थळावरील तपास, पोस्टमॉर्टम व पुराव्यांवर आधारित निष्कर्ष समोर आला.
हदगाव : शिवपुरी (ता. हदगाव) येथील दयानंद सुखानंद कदम (वय ३०) या युवकाचा मृत्यू घातपातातून नव्हे, तर त्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिस निरीक्षक संकेत दिघे यांनी दिली.