हल्लाबोल मिरवणूक : सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

file photo
file photo

नांदेड : येथील सचखंड गुरुद्वाराचा हल्लाबोल मिरवणूक उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रविवारी (ता. २५) काढण्यात आली. मात्र या मिरवणुकीत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली, घातक कृत्य आणि साथ रोगाला निमंत्रण या कारणावरुन सचखंड गुरुद्वाराच्या अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, अधीक्षक आणि पदाधिकाऱ्यांवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संदीप शिवले करत आहेत. 

शिख समाजात दसरा या सणाला अन्यनसाधारण महत्व आहे. नांदेड शहर हे शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाते. सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असतात. परंतु या वर्षी संबंध जगाला कोरोनाने घेरले असल्याने सर्वच धार्मिक कार्यक्रमावर शासनाने बंदी घातलेली आहे. मात्र येथील सचखंड गुरुद्वाराचे सचीव रविंद्रसिंग बुंगई यांनी हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी द्यावी अशी याचिका मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केली होती. दोन दिवसापूर्वी काही अटी व शर्थीवर सशर्त परवानगी दिली होती. यावरुन रविवारी दसरा सणानिमित्त हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली.

उच्चन्यायालयाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली 

ही मिरवणुक सचखंड गुरुद्वारा येथून दुपारी न्यायालयाच्या आदेशावरुन दुपारी अरदास करुन काढण्यात आली. या मिरवणुकीत गुरुद्वाराचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंतसिंग यांच्यासह पंचप्यारे व निशानसाहिब सहागी झाले होते. ट्रकमधून गुरुघरचे घोडे आभूषणाने सजवलेले घोडेही सहभागी झाले होते. मिरवणूकीत उच्चन्यायालयाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. तसेच साथ रोगाला निमंत्रण देण्यात आल्याचे पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली. 

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

या प्रकरणी हवालदार मधुकर टोनगे यांच्या फिर्यादीवरुन सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भुपिंदरसिंग मिनहास, सचीव रविंद्रसिंग बुंगई, अधीक्षक गुरविंदरसिंग वाधवा, शार्दुलसिंग फौजी, मनप्रितसिंग कुंजीवाले, गुरप्रितसिंग महाजन, गुरुचरणसिंग घडीसाज, भागींदरसिंग घडीसाज, जसबिरसिंह शाहू यांच्यासह २५० ते ३०० जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप शिवले करत आहेत.

पोलिस अधीक्षकासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची होती उपस्थिती

गुरुद्वाराचे प्राणीसंग्रहालयात सर्व भाविकांनी जावून दर्शन घेतल्यानंतर पुढे यात्रीनिवास मार्गे ही मिरवणूकीची रात्री सचखंड गुरुद्वारामध्ये सांगता झाली. यावेळी गुरुद्वाराचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलिस अधीक्षक किशोर शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस उपाधिक्षक धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक संदीप शिवले, साहेबराव नरवाडे, स्थआनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, वाहतुक शाखेचे चंद्रशेखर कदम, अनंत नरुटे यांच्यासह आदी पोलिस अधिकारी व उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची उपस्थिती होती.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com