esakal | खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मनाठा, रुई येथे आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

Health sub-centers at Manatha and Rui have been sanctioned due to MP Hemant Patils follow-up

आरोग्य यंत्रणा मजबूत व्हावी, ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महाविकास आघाडी सरकार काम करत आहे.

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मनाठा, रुई येथे आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मतदारसंघातील हदगाव तालुक्यातील मनाठा आणि रुई येथील अनुक्रमे ८० लक्ष रुपये म्हणजेच १ कोटी ६० लक्ष रुपयाच्या आरोग्य उपकेंद्राना आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी दोन्ही उपकेंद्राच्या मंजुरीकरिता सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता, त्यामुळे या भागातील ५० गावांना याचा लाभ होणार आहे.
 
आरोग्य यंत्रणा मजबूत व्हावी, ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून लालफितीमध्ये अडकून पडलेला कामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी सरकार अग्रेसर असताना खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा हिंगोली लोकसभा मतदार संघात प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण करून जनतेला उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पुढाकार घेतला आहे. त्याच अनुषंगाने हदगाव तालुक्यातील मनाठा आणि रुई येथील आरोग्य उपकेंद्र आहेत.

याबाबत वारंवार मागण्या होऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याने या भागातील जनतेला आरोग्य सेवेसाठी नांदेड किंवा हदगाव या ठिकाणी जावे लागत  होते, याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे दोन्ही ठिकाणच्या आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. अनुक्रमे  एकूण ८० लक्ष रुपये किमतीची हि उपकेंद्रे आरोग्याच्या सर्व सोयी सुविधांनी सज्ज असणार आहेत. मनाठा उपकेंद्राची इमारत ही १९८४ साली बांधण्यात आली होती. ३० वर्षानंतर ही इमारत आता धोकादायक स्थितीमध्ये आली असून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. 

या उपकेंद्राअंतर्गत अंबाडी, मसाई तांडा, कनकेवाडी, गोरामतांडा, तळ्याचीवाडी, वरवंट, जांभळा, सावरगाव यासह आदी गावांना तर रुई येथील उपकेंद्राअंतर्गत धानोरा, शिवापूर, मानवाडी, अडा, बोरगाव सह आदी गावांना लाभ होणार आहे. रुई येथे नवीन उपकेंद्राचे मागणी बऱ्याच दिवसापासून होती ती अखेर खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाली आहे. याकामी माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र मालिवाल आणि जि. प सदस्य गजानन गंगासागर यांनी सुद्धा प्रयत्न केले आहेत. त्यामुळे याभागातील जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

loading image