जोरदार पावसाने पर्यायी पूलच गेला वाहून

IMG_20200817_121653.jpg
IMG_20200817_121653.jpg

तामसा, (ता.हदगाव) : तामसा नदीवरील पर्यायी पूल रविवारी (ता.१६) झालेल्या मुसळधार पावसाच्या पुरामुळे वाहून गेला असून यामुळे हदगाव व भोकर दोन तालुक्याची वाहतूक दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे. तामसा परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार होती. या मुळे तामसा नदीला मोठा पूर आला होता. नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम चालू असून वाहतुकीच्या सोयीसाठी तात्पुरता पर्यायी नळकांडी पूल उभारण्यात आला होता. पण पुराच्या तडाख्याने हा पर्यायी पूल जरी शाबूत राहिला तरी पूलाची एका बाजू पूर्ण खरडून गेल्यामुळे हदगाव ते भोकर हा वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. 

वाहने मोठ्या प्रमाणात अडकली
सोमवारी(ता.१७) दोन्ही बाजूने वाहने मोठ्या प्रमाणात अडकली होती. पण या पर्यायी पूलाचा मोठा भाग वाहून गेल्यामुळे वाहतूक सुरू होणे शक्य नव्हते. पोळा सणाच्या आदल्याच दिवशी पूल वाहून गेल्याचा फटका तामसा भागातील अंदाजे पंधरा ते वीस गावातील नागरिक व ग्राहकांना बसला आहे. पैलतीराकडील गावे व तामसा शहराचा भाग असलेल्या शेतमजूरवाडी, तामसातांडा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा संपर्क या पर्यायी पूल वाहून जाण्यामुळे तुटला आहे. रविवारी शेताकडे गेलेले शेतकरी व पाळीव जनावरे पूल वाहण्यामुळे शेतात अडकून बसले आहेत. पावसाचा जोर थांबून तामसा नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास वाहतुकीच्या सोयीसाठी पर्यायी पूल उभारण्यात येईल असे रस्ता व पुल बांधकाम यंत्रणेने स्पष्ट केले आहे.


मध्यम पावसाच्या सरी 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे सूर्यदर्शन झाले नाही. रविवारी (ता. १६) जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडल्याने सूर्यदर्शन झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे ढग दाटून आले आहेत. रोजच पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झालेच नाही. आठ ऑगस्टचा अपवाद वगळता सात दिवस सर्वदूर हलका, मध्यम स्वरूपाचा भिजपाऊस रोजच पडत आहे. रविवारीही सकाळपासूनच रिमझिम, मधूनच हलक्या व मध्यम पावसाच्या सरी पडत होत्या. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात सूर्यदर्शन गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेले नाही.


मशागतीच्या कामांना व्यत्यय
यावर्षी खरिपाची पेरणी होताच पिकांना पोषक पाऊस झाल्याने जिल्ह्यात कपाशी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद व इतर पिके चांगली बहरल्याचे दिसत आहे. आंतरमशागतीची कामे कामे देखील जोरात सुरू असल्याचे शेतशिवारांमधून दिसून येत आहे. सध्या मुगाचे पीक हाती आले आहे; मात्र सततच्या पावसामुळे मशागतीच्या कामांना व्यत्यय येत असून पिकेदेखील पिवळी पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com