मुखेड (जि. नांदेड) - मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी (ता. १७) जोर धरला. नांदेड आणि बीड जिल्ह्यांच्या काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. लेंडी नदीला आलेल्या पुराने मुखेड तालुक्यातील चार गावांना वेढा दिला..बचाव पथकांनी दिवसभरात सुमारे ३०० ग्रामस्थांची पुरातून सुटका केली. नऊ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरूच होते. म्हशींसह ७० जनावरे वाहून गेली आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात पुरात मोटार वाहून गेल्याने एकाचा मृत्यू तर तिघांचा वाचविण्यात यश आले..उदगीर (जि. लातूर) येथे लेंडी धरण असून त्याचे दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. त्याशिवाय पाणलोट क्षेत्रात व नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने लेंडी नदीला मोठा पूर आला. त्यामुळे लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या मुखेड तालुक्यातील चार गावांना पुराचा वेढा बसला..राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), शीघ्र कृती दल, पोलिस आदींच्या संयुक्त पथकाने बचावकार्य सुरू केले. तालुक्यातील रावणगाव येथील २२५, हासनाळमधील सहा, भिंगोली येथील ४० अशा एकूण २७१ जणांची पथकांनी सुखरूप सुटका केली. रावणगाव येथे ८० ते १०० जण पुरात अडकले होते. रावणकोळा भागातील तीन, हासनाळ येथील सहा असे नऊ जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली..झाडावर चढून केला बचावनदीनाल्यांना पूर आल्यामुळे मुक्रमाबाद येथून उदगीर, देगलूर, मुखेड, औराद या तालुक्यांकडे जाणारी वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे बंद आहे. देगलूर तालुक्यातील गवंडगाव येथील मोटार वाहून गेली. त्यातील एकाने झाडावर चढून आपला बचाव केला तर दुसरा वाहून गेला. निजामाबाद येथील तीन जण वाहून गेले. त्यातील दोघांनी बचाव केला असून वाहून गेलेल्यांचा शोध सुरू असल्याचे मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी सांगितले.इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे किनवट शहरातील नदी किनाऱ्यावरील गोशाळेमध्ये पाणी शिरून सुमारे पंचवीस जनावरे वाहून गेली असून, काही दगावली आहेत..४४ म्हशी वाहून गेल्यामुक्रमाबाद (ता. मुखेड) येथील बामणी मार्गावरील बालाजी शंकरअप्पा खंकरे यांच्या मालकीची शेड, ४० दुभत्या म्हशी वाहून गेल्या. देगलूर मार्गावरील मन्मथ नागनाथअप्पा खंकरे यांच्या मालकीची शेड, चार म्हशी, दोन दुचाकी वाहून गेल्या..‘विष्णुपुरी’ प्रकल्पातून विसर्गनांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘विष्णुपुरी’ प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून २ हजार ९७० क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी पात्र दुथडी भरून वहात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.