Himayatnagar Water Crisis : टंचाई निवारणार्थ १९.४४ कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर

हिमायतनगर : तत्काळ उपाययोजना हाती घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना
Himayatnagar Water Crisis
Himayatnagar Water CrisisSakal

हिमायतनगर : तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते मार्च २०२४ , एप्रिल ते जून २०२४ या कालावधीसाठी ग्रामीण पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार आराखड्यातील उपाययोजना आवश्यकतेनुसार तत्काळ हाती घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती उपअभियंता सतीश हिरप यांनी दिली.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विकास आराखड्यानुसार नवीन विंधन विहीर घेणे यासाठी अपेक्षित खर्च प्रती गाव ९० हजार रुपये असून, यामध्ये वडगाव तांडा वडगाव अबादी, धानोरा ज., कार्ला पी., रमनवाडी, बोरगडी तांडा न. २,

कांडली खु., विरसनी २, पिंपरी, दुधड, वाळकेवाडी, वाळकेवाडी २, रामबापूनगर, वडाची वाडी, पार्डी ज., खैरगाव ज., लाईनतांडा, बोधनतांडा, एकंबा, पवना २, पवनातांडा, दस्तगीरवाडी, पावनमारी, पारवा खु., सवना ज.,

महादापूर, सिरंजनी, टेंभी, पारवा बु., फूलसिंग तांडा, एकघरी, बळीराम तांडा, आदी गावांचा समावेश आहे. तसेच विंधन विहीर विशेष दुरुस्तीसाठी अपेक्षित खर्च २० हजार यात वडगाव ज., वडगाव तांडा, वडगाव अबादी, धानोरा ज., कार्ला पी., पिछोंडी जवळगाव, स्टेशन अबादी, एकघरी, रमनवाडी, बोरगडी,

बोरगडी तांडा न. १, २, कांडली खु., विरसनी, पिंपरी, दुधड, वाळकेवाडी, रामबापूनगर, वडाची वाडी, पार्डी ज., दरेसरसम, करंजी, चिंचोर्डी, दगडवाडी, खैरगाव ज., लाईनतांडा, बोधनतांडा, एकंबा, पवना, पवनातांडा, दस्तगीरवाडी,

टेंभूर्णी, पावनमारी, पारवा खु., सवना ज. महादापूर, सिरंजनी, टेंभी, शिबदरा ज., सरसम बु., इंद्रनगर, कोतलवाडी व तांडा, पारवा बु, मोरगाव, कांडली बु., कोकातांडा, वटफळी, बळीराम तांडा या गावांचा समावेश असून विहीर अधिग्रहण करणे यासाठी अपेक्षित खर्च प्रती गाव ५४ हजार रूपये तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये पिछोंडी, बोरगडी, दुधड, वाळकेवाडी, पारडी ज, दगडवाडी, खैरगाव ज, बोधनतांडा, टेंभूर्णी, पावनमारी, महादापूर, टेंभी, सरसम बु, इंदिरानगर, फूलसिंग तांडा, बळीराम तांडा, मंगरूळ, सोनारी, घारापूर, सिरपल्ली, शेल्लोडा, गणेश वाडी, टाकराळा बु, मानसिंग तांडा, वारंगटाकळी, भोडणीतांडा, काळूनाईक तांडा, कामारवाडी, कौठा ज, कौठावाडी, कौठा तांडा, खैरगाव ता, पोटातांडा, वाशी, बळीराम तांडा आदी गावांचा समावेश आहे.

याकरिता १९ कोटी ४४ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली असून, मार्च २०२४ ते एप्रिल ते जून महिन्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाई निवारणासाठी हा खर्च करण्यात येणार आहे अशी माहिती पाणीपुरवठ्याचे अभियंता हिरप यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com