

Nanded News
esakal
हिमायतनगर: सिरंजनी-हिमायतनगर मुख्य रस्त्यावर दुष्काळी फाटा येथे ‘सीडी’ वर्कमधील सिमेंट पाइपला मोठे छिद्र पडल्याने रस्ता पूर्णतः खचल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सदर मार्गावरील वाहतूक विस्कळित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.