

Hind Di Chadar
esakal
नवी दिल्ली : श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी "हिंद दी चादर' या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या राज्यस्तरीय समागम समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांनी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे निमंत्रण केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांना देण्यात आले. त्यानुसार, शाह यांनी निमंत्रण स्वीकारत सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.