
हिंगोली : खिशात पैसे बाळगायची कटकट नको म्हणून अनेक जण कॅशलेस व्यवहारांकडे वळले आहेत. यामध्ये युवावर्ग आघाडीवर आहे. सुटे पैसे नसणे, नोटा खराब असणे अशा अडचणींतूनही कॅशलेस व्यवहारांमुळे सुटका मिळाली आहे. शहरी भागांसह खेडेगावातही चहावाले, किराणा दुकानदार, भाजीपाला, आइस्क्रीम, पानटपरी, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांसह छोट्या-मोठ्या दुकानांत आता कॅशलेस व्यवहारांची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे सुट्या नाण्यांची समस्या मिटली आहे.