गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर आमदार जवळगांवकरांनी धरले तास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या गुढी पाडव्याच्या निमित्ताने हदगाव- हिमायतनगर विधान सभेचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी आपल्या शेतात सर्जा, राज्यांच्या मदतीने तास धरले व तसेच मनोभावे पुजा केली आहे.

गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर आमदार जवळगांवकरांनी धरले तास

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : गुढी पाडवा हा सन मराठी वर्ष म्हणून साजरे केले जाते. या निमित्ताने गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. कोरोना संसर्गजन्य महामारीच्या संकट काळात या वर्षीचा गुढी पाडवा हा सन साजरा होतोय. आजच्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा राज्याच्या मदतीने शेतात तास करुन देवदेवतांना नैवेद्य देवून भावपूर्ण नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली जाते. या गुढी पाडव्याच्या निमित्ताने हदगाव- हिमायतनगर विधान सभेचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी आपल्या शेतात सर्जा, राज्यांच्या मदतीने तास धरले व तसेच मनोभावे पुजा केली आहे.

या निमित्ताने आमदार जवळगांवकर यांना बोलते केले असता ते म्हणाले की, गुढी पाडवा ह्या सनाला मराठी वर्षात अतिशय महत्व आहे. शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी पाडवा हा सन नवी आशा, आकांक्षा घेवून येणारा असा आनंदद्वगुणित करणारा असा सन मानला जातो आहे. या वर्षी दुर्दैवाने पाडवा या सनावर कोरोना महामारीचे संकट आहे. 

हेही वाचाकोरोना फिव्हरमध्ये खेकडा आणि गावरानी अंड्याची मागणी वाढली

अश्या संकट समयी नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे, तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधावा, सामाजिक अंतर ठेवावे, शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करावे, नागरिकांनी कोरोना महामारीच्या संकटाला धैर्याने तोंड द्यावे. असे अवाहन केले. या महाभयंकर संकटातून सर्वाना मुक्ती मिळावी. अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली असल्याचे आमदार जवळगांवकर यांनी बोलतांना सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: Hours Held Mla Jawalgaonkar Auspicious Occasion Gudi Padva Nanded News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedHadgaon