माणुसकीचा ओलावा आटला : चक्क मुख्याधिकाऱ्यांनी दिला, वृध्देच्या प्रेताला खांदा

प्रल्हाद हिवराळे
Thursday, 6 August 2020

सुशिलाबाई ही शेवटची घटका मोजत असताना बुधवारी (ता. पाच) तिचा मुत्यू झाला. सुशिलाबाईला एक मुलगीच आहे.

उमरी (जिल्हा नांदेड) : उमरी शहरातील म्हाडा काॅलनीत  अग्रवाल नावाचे एक छोटस कुटूंब राहते. या कुटुंबाची अत्यंत हालाकीची परिस्थिती. यातच वयोवृद आई सुशिलाबाई बाबुलाल अग्रवाल (वय ९०) व मुलगी आशाबाई बाबुलाल अग्रवाल (वय ५६) ह्या दोघीच घरात राहतात. आशाबाई ही अंगणवाडी सेविका आहे. आई घरात  पंलगांवर पडून होती. सुशिलाबाई ही शेवटची घटका मोजत असताना बुधवारी (ता. पाच) तिचा मुत्यू झाला. सुशिलाबाईला एक मुलगीच आहे. मुलाचा काही वर्षापूर्वीच निधन झाले होते. त्यांच्याकडे पुरुष मंडळी नसल्याने व तसेच नातेवाईक सुधा नव्हते. 

डोळ्यासमोर आईचा मृतदेह, अंत्यसंस्कार कसे करावे ह्या विवंचनेत सापडलेल्या आशाबाई याना काही सुचत नव्हते. आईच्या मृतदेहासमोर त्या रडण्याकडे पलिकडे काहीच करु शकत नव्हत्या. शेवटी त्यांनी मृतदेह घरातच ठेवून सरळ नगरपालिका गाठली. सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे हे आपल्या खुर्चीत बसुन शहरातील कोरोना विषयी आढावा घेत होते. 

साहेब माझ्या आईचे निधन झाले

तेवढ्यात आशा अग्रवाल यांनी तेथे येऊन रडायला सुरूवात केली. साहेब माझ्या आईचे निधन झाले, घरात पुरूष मंडळी कोणीही नाही. अंत्यसंस्कार करायचे आहे. आम्हाला मदत करा असे आशाबाई अग्रवाल मदत मागताच मुख्यधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन क्षणाचा विलंब न करता आशाबाईला घेऊन तिचे घर गाठले. तेथिल परिस्थिती पाहिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अंत्यविधीचे साहित्य गोळा करण्यास सुरूवात केली. कर्मचाराना घेऊन अंत्यविधीचे साहित्य घेऊन मुत्यूदेह तिरडीवर 

हेही वाचा -  अठराविश्वे दारिद्र्यातून केले यशाचे शिखर सर

आधिकारी आहोत म्हणून तोऱ्यात वागतात

ठेवला. सुशिलाबाई अग्रवाल यांना कोणीही नातेवाईक नसल्याने स्वत: मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी व कर्मचारी गणेश मदने, चंद्रकांत श्रीकांबळे, कुलदीप सवई, लक्ष्मण शेळके आदीनी तिरडीला खांदा देऊन वैकुंठधाम स्मशान भुमित घेऊन काकासाहेब डोईफोडे यांनी शेवटची अग्णी दिले. बरेच आधिकारी कोणत्या ना कोणत्या विभागातील कार्यालयात असतात. आम्ही आधिकारी आहोत म्हणून तोऱ्यात वागतात. पण मानुसकी दाखवणारे काकासाहेब डोईफोडेसारखे बोटावर मोजणारे आधिकारी कमीच आहेत. काकासाहेब डोईफोडे यांचे आर्दश इतर आधिका-यांनी घेण्यासारखे आहे.

काकासाहेब डोईफोडे यानी पूढाकार घेवून मयताचे अंत्यसंस्कार सोपस्कार पूर्ण 

सध्या कोरोना काळ आहे. कोणाच्या कोणी जवळ येऊन मदत करायला तयार नाही. या सुशिलाबाई यांना तर  नातलग, ना शेजारचे लोक धावले नाही. नगर परिषद प्रशासनास लागताच स्वतः मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यानी पूढाकार घेवून मयताचे अंत्यसंस्कार सोपस्कार पूर्ण तर केलेच स्वतः व न. प.कर्मचारी मयताच्या तिरडीला खांदा देवून आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून काम केले. यावेळी अंत्यविधीप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण सारडा, नगराध्यक्ष प्रतिनिधी संदानंद खांडरे, नगरसेवक बाळू शिंदे, नगर परिषद कर्मचारी गणेश मदणे, कुलदिप सवई, ईश्वर रणनवरे, लक्ष्मण शेळके यांच्यासह नगर पालिका कर्मचारी यांनी अत्यंविधीचा सोपस्कार पार पाडला.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: humanity has dried municipal chief officer gave, shoulder to old woman's deathboady nanded news