नांदेडमध्ये केमिकल टाकून पत्नीस जाळणारा पती कोठडीत; पत्नी गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी

नांदेडमध्ये केमिकल टाकून पत्नीस जाळणारा पती कोठडीत; पत्नी गंभीर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : अनैतीक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पत्नीस सतत मारहाण करुन तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला. एवढएच नाही तर चक्क ता. १८ मे रोजी तिच्या अंगावर लाकडी फर्निचरला वापरण्यात येणारे थिनर नावाचे केमिकल ( Thinar chemical) टाकून पेटवून दिले. यात ती गंभीर असून तिच्यावर शासकिय रुग्णालयात (Nanded government hospital) उपचार सुरु आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अटक केलेल्या पती व दिराला न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. (Husband- custudy- in Nanded- for throwing- chemicals at wife- Wife serious)

याबाबत अधिक माहिती अशी की शहराच्या विठ्ठलनगर भागात २२ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह राहते. पतीचे अनैतीक संबंध तिला समजल्यावरुन ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती. मात्र हे पतीला मान्य नव्हते. यावरुन तिचा शारिरीक व मानसिक छळ त्याच्यासह सासरची मंडळी करत होती. वेळप्रसंगी पतील तिला मारहाण करत असे. उपाशी पोटी ठेवून तिलाच जीवे मारण्याची धमकी देत होते.

हेही वाचा - ऑक्सिजन निर्मिती करणारी झाडं कोणती माहित आहे का?

ता. १८ मे रोजी सायंकाळी पाऊस सुरु झाल्याने ती छतावर सुकण्यासाठी टाकलेले कपडे काढण्यासाठी जात असताना तिच्या जावनने अडविले. यावरुनच त्यांच्यात वाद झाला. एवढेच नाही तर चक्क पतीने घरात लाकडी फर्निचरला लावण्यात येणारे रसायन द्रव पत्नीच्या अंगावर टाकून पेटवून दिले. यात ती चांगलीच भाजली. आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धाऊन आले. जखमी विवाहितेला शासकिय रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबाबावरुन विमानतळ पोलिस ठाण्यात पती हनुमंत किशन पांचाळ, दीर सूर्यकांत पांचाळ, जाऊ योगिता पांचाळ, सासू राधाबाई पांचाळ, सासरा किशन पांचाळ आणि दीर नंदू पांचाळ यांच्याविरुद्ध संगनमताने जीवे मारण्याचा प्रयत्न, विवाहितेचा छळ या कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संजय ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ देवके व त्यांच्या साथिदाराने पती, दीर व जाऊ या तिघांना अटक केली. तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी जाऊ योगीता पांचाळ हिला न्यायालयीन कोठडीत पाठवून पती हनुमंत पांचाळ आणि दीर सुर्यकांत पांचाळ यांना शनिवार (ता. २२) पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. तपास फौजदार एकनाथ देवके करत आहेत.

loading image
go to top