esakal | जियेंगे तो साथ, मरेंगे तो भी साथ; चुलता पुतणीसोबत सैराट

बोलून बातमी शोधा

प्रेमी युगल
जियेंगे तो साथ, मरेंगे तो भी साथ; चुलता पुतणीसोबत सैराट
sakal_logo
By
बंडू माटाळकर

निवघाबाजार (जिल्हा नांदेड ) : येथील एक प्रेमीयुगल ता. २४ एप्रीलच्या रात्री घरच्याना माहित न होऊ देता चुलत्यानेच पुतणीला गाडीवर घेऊन पसार झाल्याची व नात्याला कलंक लावणारी घटना निवघा ( बा.) येथे घडली.

याबाबत सविस्तर वृत असे की, येथे छोटासा व्यवसाय करणारा दुकानदार व याच दुकानात कारागीर करणारे काही मुलं, त्यामुलापैकी एक असलेला आपलाच सखा चुलत भाऊ म्हणून दुकानात काम करण्यासाठी ठेवला होता. या २४ वर्षीय युवकाने आपल्याच सख्या चुलत भावाच्या मुलीला जाळे टाकुन प्रेमात पाडले! हळूहळू त्यांच्या प्रेमाला बहार येऊ लागला. यामुळे कशाचेही निमित्य करुन हा तरुण मुलीच्या म्हणजे आपल्या चुलत भावाच्या घरी जाऊ येऊ लागला. आपल्याच घरचा युवक असल्याने घरातील कोणालाही शंका आली नाही.

हेही वाचा -

परंतू कालांतराने मुलीच्या- आई वडीलांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्या युवकाला दुकानातून काढून टाकले व घरी येण्यास मज्जाव केला. हे प्रेमी युगल एवढयावरच न थांबता, मोबाईलवर बोलत असल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. व २४ एप्रीलच्या रात्री या दोघांनी घरातून सोनं, पैसा इत्यादी सामान घेऊन पळ काढला. घरच्यानी इतरत्र शोध घेतला असता दोघे कोठेही आढळून आले नाही. याबाबत तशी तक्रार मुलीच्या वडीलानी पोलिसात दिली. पोलिसांच्या मदतीने या दोन प्रेमी युगलाचा चार दिवसानंतर आंध्र प्रदेशातील एका गावात शोध लावून त्याना गावात आणण्यात आले. गावकऱ्यांनी त्या दोघाना खुप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हा दोघांच नातं मुलगी व वडीलाप्रमाणे आहे. हे अशोभणीय बाब आहे.यामुळे समाजात वेगळा मॅसेज जाईल? ते प्रेमी युगल कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जियेंगे तो साथ, मरेंगे तो भी साथ अशा शपथा घालून पुन्हा दोघे प्रेमी युगल मोटारसायकवर निघून सैराट झाले. सख्या चुलत काकानी पुतणीला पळवून नेल्याने या पवित्र नात्याला काळीमा फासवून समाजात विष कालवल्याच्या प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडून निघाल्या.

संपादन- प्रल्हाद कांबळे