वाचाल तर वाचाल : हा संदेश तर देत नसेल ना ही महिला

प्रल्हाद कांबळे
Monday, 7 September 2020

वाचनापासून दूरावलेल्या विद्यार्थ्यांना किंवा समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम रस्त्यावर निराधार व मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेली एक महिला संदेश तर देत नसेल ना. कारण ती दररोज वर्तमानपत्र चाळत असते. वर्तमानपत्र वाचत असतानाचे तिचे छायाचित्र सोशल माध्यमावर व्हायरल झाले आहे.

नांदेड : ज्याच्या घरात पुस्तक, त्याचे सशक्त मस्तक असून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनेक ग्रंथात नमुद केलेले आहे. मात्र सध्याच्या मोबाईल युगात अनेकजण वाचनापासून परावृत्त होत आहेत. त्यांना वाचनाची गोडी किंवा रुची राहिली नाही. तर दुसरीकडे अजूनही काही मंडळीकडून वाचनसंस्कृती टिकून आहे.

वाचनापासून दूरावलेल्या विद्यार्थ्यांना किंवा समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम रस्त्यावर निराधार व मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेली एक महिला संदेश तर देत नसेल ना. कारण ती दररोज वर्तमानपत्र चाळत असते. वर्तमानपत्र वाचत असतानाचे तिचे छायाचित्र सोशल माध्यमावर व्हायरल झाले आहे. ही महिला देगलुर नाका, नांदेड भागात मिळेल त्या रस्त्याच्या कडेवर विसावा घेत असते. 

वाचाल तर वाचाल हा संदेश संबंध देशभर

अनेकांना वाचण्यासाठी योग्य ते पुस्तके व साहित्य मिळत नाही. अनेक जण वर्तमानपत्र वाचून आपली वाचनाची भूक भागवतात. तर दुसरीकडे पुस्तकांचा संग्रह असतानाही सध्याच्या विज्ञान युगात वाचनापासून अनेकजण दुरावलेले आहेत. मात्र वाचाल तर वाचाल हा संदेश संबंध देशभर असतानाही अनेक जण वाचनापासून परावृत्त झाले आहेत. परंतु नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील रस्त्यावर एक निराधार व मानसिक संतुलन ढासळलेली एक महिला चक्क वर्तमानपत्र वाचत असताना दिसत आहे. खरंच वर्तमानपत्र वाचत आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. नित्यनेमाने तिला काही जण वर्तमानपत्र आणून देतात व ती वर्तमानपत्र वाचते.

हेही वाचासस्पेन्स, ड्रामा, ॲक्शनचा गोड शेवट लग्नबेडीत

मोबाईल युगात विद्यार्थी वाचनापासून दूर गेला 

परंतु तिच्या वाचनाचा तिला खरंच फायदा होतो का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र तिने सध्या वावरत असलेल्या मोबाईल युगात विद्यार्थी वाचनापासून कसा दूर गेला व त्याला वाचनाची गोडी कशी निर्माण करायची याचे समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याचे दिसून येते. सदर महिला ही उघड्यावर फुटपाथवर बसून दिवसभर हातात पडेल ते वर्तमानपत्र चाळते. तिच्या या वाचनाची गोडी समाजातील अनेक विद्यार्थ्यांना व वाचनापासून दुरावलेल्या व्यक्तींना मिळू शकते. 

सोशल माध्यमावर व्हायरल 

या महिलेचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला तर नक्कीच वाचनाची गोडी निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. कारण वर्तमानपत्रांमध्ये संबंध जगभरात नेमक्‍या काय घडामोडी चालू आहेत याची इत्यंभूत माहिती असते. व ते वर्तमानपत्र वाचल्यामुळे या जगातील घटना घडामोडी आपल्या लक्षात येतात. असेच एक वर्तमानपत्र वाचत असताना पत्रकार सादिक शेख यांनी त्या महिलेचे छायाचित्र टिपले असून त्यांनी ते सोशल माध्यमावर व्हायरल केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you read, you will read: This woman is not giving this message nanded news