अवैध दारू विक्रीचा सपाटा सुरुच.....कुठे ते वाचा 

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात मद्यविक्री बंद असल्यामुळे अवैध देशी दारू तसेच गावठी दारू विक्री करण्याचा व्यवसाय फोफावला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री केंद्र सुरू झाले. परंतु यानंतरही जिल्ह्यात अवैधरित्या विदेशी देशी तसेच गावठी दारू विक्री करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे.

६१ हजारांची दारु केली जप्त
रामतिर्थ पोलीस ठाण्यांतर्गत नरसी ते नांदेड रोडवरील मराठा बारच्या पाठीमागे गुरुवारी (ता. २८) सायंकाळी आठच्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीररित्या ६१ हजार १९९ रुपयाची विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आला. तसेच शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.

दोन हजार ४९६ रुपयांची देशी दारु विक्री जप्त
दुसऱ्या घटनेत धर्माबाद शहरातील दुर्गानगरमधील दुर्गा मंदिरा समोरच्या रोडवर विनापरवाना बेकायदेशीररित्या दोन हजार ४९६ रुपयांची देशी दारु विक्री करण्याचे उद्दिष्टाने बाळगून आला. याप्रकरणी पोलिस जमादार रावसाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन हजार दोनशे रुपयांची देशी दारू पकडली
तिसरी घटना नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत नवीन नांदेड सिडको येथील वसंतराव नाईक कॉलेज समोर एकाने विनापरवाना बेकायदेशीररित्या दोन हजार दोनशे रुपयांची देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आली. याप्रकरणी पोलिस जमादार देविदास पवसर यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार श्री कऱ्हाळे करीत आहेत. 

लाखाचा ऐवज पळविला
ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत नवीन नांदेड सिडको येथील वसंतराव नाईक कॉलेज समोर एका घराचा चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी कपाटाचे लॉकर तोडून आतील नगदी रक्कम तसेच सोन्याचे दागिने असे एकूण एक लाख दोन हजार ९०९ रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना रविवारी (ता. २४) सकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी अशोक रामचंद्र कासेवाड यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार श्री घोळवे करीत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com