Nanded News : अवैध वाळूसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Illegal Sand Transport : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बोढारजवळील पुलाजवळ कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिसांनी रात्री पेट्रोलिंगदरम्यान बोढार गावाजवळील पुलाजवळ कारवाई करत तब्बल २५ लाख रुपयांची अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला. टिप्परचालक राम शत्रुघ्न सोनटक्के (रा. ब्राह्मणवाडा, ता. नांदेड) याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.