esakal | लोह्यात रुग्ण व नातेवाईक यांना रोज १०० जणांना मिऴणार जेवणाचे डब्बे; खा. चिखलीकरांच्या हस्ते आज शुभारंभ

बोलून बातमी शोधा

Loha
लोह्यात रुग्ण व नातेवाईकांना रोज १०० जणांना मिऴणार जेवणाचे डब्बे
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

लोहा (नांदेड) : लोहा शहरात चार कोविड सेंटरमध्ये ग्रामीण भागासह लगतच्या पालम कंधार तालुक्यातील रुग्ण कोरोनाचा उपचार घेत आहेत. त्याची जेवणाची परवड होऊ नये, यासाठी जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे सहकारी व व्यापारी मित्र परिवार सामाजिक दायित्व म्हणून संचार बंदीच्या काळात "आधार गरजूना"! या उपक्रमअंतर्गत दररोज १०० रुग्ण व नातेवाईक यांना जेवणाचे डब्बे त्या त्या हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहेत. या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयात अकरा वाजता होणार आहे.

70च्या दशकात जेव्हा अन्नधान्य तुटवडा होता. तेव्हाही लोह्याच्या मोंढयातील व्यापारी, गावातील प्रमुख दानशूर व्यक्तींनी लोकांच्या जेवणाची सोय केली होती. त्यांचीच दुसरी तिसरी पिढी पुन्हा एकदा गरजवंताच्या मदतीला धावून आली आहे. भाजपा व व्यापारी मित्र परिवार यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने कोरोना रुग्ण व नातेवाईक यांना दररोज एक हजार जेवणाचे डब्बे दिले जात आहेत. हीच सामाजिक दायित्व लोह्यात स्वीकारण्यात आली आहे.

माजी नगराध्यक्ष भाजप शहराध्यक्ष किरण वटटतमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेल्लवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार, व्यापारी असोसिएशनचे सूर्यकांत (बाळू सावकार) पालिमकर, प्रा. डॉ धनंजय पवार, सरस्वती पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, गंगा साडी सेंटरचे तुकाराम सावकार कोटलवार, विजय कटकमवार, नगरसेवक दता वाले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

उपजिल्हा रुग्णालय असलेले शासकीय कोविड हॉस्पिटल, डॉ. धनसडे यांचे मेडिकेअर कोविड हॉस्पिटल, डॉ. पवार यांचे श्री साई हॉस्पिटल, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. जवळगेकर यांचे जगदंबा कोविड हॉस्पिटल या चारही ठिकाणी दररोज रात्री सात वाजता १०० जणांचा जेवणाचे डब्बे सोबत पाण्याची बॉटल दिली जाणार आहे. याशिवाय कोविड सेंटर मधील (शासकीय) ड्राय फूड जसे की काजु, बदाम, मनुके, इ. पहिल्या दिवशी दिले जाणार आहे. ही सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या सामाजिक उपक्रमासाठी भाजप शहर व व्यापारी मित्रपरिवार यांनी पुढाकार घेतला आहे.

या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर येथे मंगळवारी २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ माणिकराव मुकदम, तहसीलदार विठ्ठल परळीकर, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांची उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमामुळे कोविड रुग्ण व नातेवाईक यांना मोठा आधार होणार आहे. शहरात नेहमीच किरण वटटमवार, केशवराव मुकदम, दिनेश तेल्लवार, नामदेव सावकार कटकमवार, बाळू सावकार, हरीभाऊ चव्हाण, प्रा. डी. एम. पवार, दता वाले, दीपक कानवटे व मित्र परिवार यांनी नेहमीच विधायक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक मदतीसाठी भरभरून सहकार्य करणाऱ्या या टीम पुन्हा एकदा कोविड काळात गरजूंचा आधार बनली आहे.