esakal | मुदखेड शहरामध्ये डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त गरीब महिलांना साड्यांचे वाटप

बोलून बातमी शोधा

भीमजयंती मुदखेड
मुदखेड शहरामध्ये डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त गरीब महिलांना साड्यांचे वाटप
sakal_logo
By
गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड शहरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोरोनाचे पालन करुन साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे.

मुदखेड शहरातील भिमनगर, नवी आबादी, लिंबूनीनगर, अशोकनगर, समतानगर, एरिकेशन कॉलनी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प, धूप व दीप पूजा करुन अभिवादन करण्यात आले.

मुदखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन नगरसेवक प्रतिनिधी रावसाहेब चौदंते यांच्याकडून गरीब गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा - काळजी घ्या पण काळजी करु नका असा रुग्ण, नातेवाईकांना जिव्हाळ्याचा सल्ला देतानाच येत्या दहा दिवसांत अख्या महाराष्ट्रातून कोरोना विषाणू हद्दपार होणार

कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती मुदखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सुर्यकांत चौदंते, अविनाश झमकडे, साहेबराव कांबळे राहेरकर, संतोष पाटिल गाडे, बालाजी बिनगे, उपासक एकनाथ तारु, राहुल चौदंते, शेख जब्बार, संदिप चौदंते, पोलिस कर्मचारी बलविरसिंग ठाकूर, गंगाधर शिंदे, व नगर परिषद कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुदखेड शहरांमध्ये कोरोनाच्या पंचसूत्रीचे पालन करुन भिम जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले भिम अनुयायी निवृती चौदंते, जयप्रकाश चौदंते, भुजंगराव कसबे, डी. जी. चौदंते, एकनाथ तारु, पांडुरंग चौदंते, मोहन चौदंते, रत्नाकर तारु, सिद्धार्थ चौदंते, धम्मा कांबळे, अमोल चौदंते, गौतम क्षिरसागर, राजु चौदंते, मुन्ना कांबळे व मुदखेड शहरातील सर्व भिम जयंती मंडळ व उपासक- उपासिका उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे