मॉन्सूनपूर्व कामांचा उडाला बोजवारा...

कामांचा दर्जा निकृष्ट; जिल्हा प्रशासनासह महापालिका, महावितरणचे दुर्लक्ष
Drainage
Drainage Sakal

नांदेड - पावसाळा आता काही तासांवर येऊन ठेपला आहे तरी देखील अजूनही महापालिकेकडून नाल्यांची साफसफाई पूर्ण झाली नाही त्याचबरोबर महावितरणच्या वतीनेही विद्युत तारांना अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे कामही पूर्ण झाले नाही. ज्या ठिकाणी ही कामे झाली आहेत ती पाहता त्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. थातूर मातूर पद्धतीने आटोपण्यात आलेल्या या कामांमुळे पावसाळ्यात मात्र सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

पावसाळा येण्याआधी प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना दरवर्षी मे महिन्यात करण्यात येतात. यंदाही या कामांना सुरूवात करण्यात आली. विशेष करून महापालिका, नगरपालिका, महावितरण आदी विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात येतात. नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीनेही शहरातील लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यास सुरूवात झाली. पोकलेन आणि मनुष्यबळाच्या मदतीने ही साफसफाई करण्यात येत असली तरी कामाचा दर्जा मात्र निकृष्ट असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी पुन्हा नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तशीच घाण असल्याचे दिसून येते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या आधी महापालिकेच्या पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे.

महावितरणच्या वतीने विद्युत खांबावरील तारांना अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, त्या ठिकाणी देखील तोडलेल्या झाडांच्या फांद्या तशाच खाली ठेवण्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी तोडलेल्या फांद्या झाडावरच लटकत आहेत. हा प्रकार छत्रपती चौक ते भगवान परशुराम (मोर) चौक या रस्त्यावर पहायला मिळाला. त्यामुळे पावसाळ्यात आणि वादळी वाऱ्यामध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरण विभागाने तत्काळ याबाबत संबंधितांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याची गरज असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com